शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

बेल्जियमविरुद्ध सुरुवातीला आघाडी मिळविणे आवश्यक

By admin | Updated: August 14, 2016 04:00 IST

उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित करणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे अभिनंदन ! आता खेळाडूंच्या फिटनेसची व मानसिक कणखरतेची खरी कसोटी लागणार आहे. भारताने सुरुवातीच्या

- धनराज पिल्ले लिहितो...उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित करणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे अभिनंदन ! आता खेळाडूंच्या फिटनेसची व मानसिक कणखरतेची खरी कसोटी लागणार आहे. भारताने सुरुवातीच्या तीनपैकी दोन सामन्यांत विजय मिळवत आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली, पण नेदरलँड व कॅनडाविरुद्धच्या लढतींमध्ये भारतीय संघांकडून चाहत्यांना अपेक्षित खेळ बघायला मिळाला नाही. आता भारतीय संघाकडून वारंवार होत असलेल्या चुकांबाबत चर्चा करू. मी रेफरीकडून कार्ड मिळण्याबाबत आणि प्रतिस्पर्धी संघाला पेनल्टी कॉर्नर बहाल करण्याबाबत चर्चा करीत आहे. पेनल्टी कॉर्नरचा मुद्दा यासाठी महत्त्वाचा आहे कारण प्रत्येक संघात त्यासाठी स्पेशालिस्ट खेळाडू आहेत. त्यामुळे आपला संघ अडचणीत येऊ शकतो. विद्यमान हॉकीमध्ये कुठल्याही संघासाठी नऊ खेळाडूंसह विजय मिळवणे शक्य नसते. कारण दहा वर्षांमध्ये हॉकीमध्ये बरेच बदल झाले आहेत. त्यामुळे सीनिअर खेळाडूंना माझा सल्ला आहे की, रेफरीकडून कार्ड मिळू नये यासाठी प्रयत्नशील असावे. जर असे घडले नाही तर संघाची पुढील वाटचाल खडतर होईल. बेल्जियमविरुद्ध उपांत्यपूर्व लढत महत्त्वाची आहे. यापूर्वीच्या लढतीचा विचार न करता भारताने बेल्जियमविरुद्धच्या लढतीत चांगली कामगिरी कशी करता येईल, यासाठी प्रयत्नशील असावे. प्रत्येक लढत वेगळी असते. भारताला एस.व्ही. सुनील व त्याच्या आघाडीच्या फळीकडून मोठ्या आशा आहेत. त्याचसोबत प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध पेनल्टी कॉर्नर कसे मिळवता येतील, यासाठी त्यांनी प्रयत्नशील असावे. त्यामुळे फॉर्मात असलेल्या रुपिंदर व रघुनाथ यांना गोल नोंदविण्याची संधी मिळेल. भारतीय संघाने सुरुवातीला गोल नोंदवीत आघाडी घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. त्यामुळे सामन्यावर नियंत्रण मिळवता येते. भारतीय खेळाडूंनी चेंडूवर नियंत्रण राखले त्यावेळी अनुकूल निकाल मिळाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारतीय खेळाडूंनी त्यावर भर द्यावा. भारतीय खेळाडूंनी आत्ममश्गुल न राहता आत्मविश्वासाने खेळावे.सुरुवातीच्या पाच मिनिटांच्या खेळामध्ये सरदार, मनप्रीत, रघुनाथ यांनी प्रतिस्पर्धी संघातील कच्चे दुवे हेरून कुणाला लक्ष्य करायचे, हे निश्चित करायला हवे. प्रशिक्षकांची सकारात्मकता संघाचा आत्मविश्वास उंचावण्यास महत्त्वाची ठरेल. बेल्जियमविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळवला तर स्वातंत्र्य दिनाचा आनंद द्विगुणित होईल. जय हिंद ! (टीसीएम)