शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पायाभूत सुविधा ‘अपडेट’ हव्या, प्रशिक्षकांचंही मूल्यमापन करा : क्रीडामंत्री

By admin | Updated: April 19, 2017 19:16 IST

भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या(साई) काही केंद्रांची अवस्था दयनीय आहे. कोचेस देखील आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडताना दिसत नसल्याबद्दल

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या(साई) काही केंद्रांची अवस्था दयनीय आहे. कोचेस देखील आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडताना दिसत नसल्याबद्दल केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी बुधवारी तीव्र नापसंती व्यक्त केली. साई केंद्रांमधील सुविधा तसेच कोचेसच्या कामगिरीबद्दलचा अहवाल त्यांनी मागविला आहे.
 
गोयल म्हणाले, ‘मी अलीकडे रायपूरच्या साई केंद्राचा दौरा केला. साईचे केंद्र सामाजिक कार्यक्रमांसाठी भाड्याने देण्याचे काम स्थानिक यंत्रणा करीत असल्याबद्दल मी आश्चर्यचकित झालो. रायपूरचे साई केंद्र राज्य शासनाच्या स्टेडियममध्ये आहे. स्थानिक महापालिका  केंद्राचा परिसर लग्नसमारंभासाठी भाड्याने देते. यातून मोठ्या रकमेचा अपहार होत असावा. साई केंद्रातील सुविधांची अवस्था अत्यंत बिकट आहे. ’ ते पुढे म्हणाले,‘साई केंद्रात कोचेस आहेत पण त्यांच्याकडे खेळाडू उपलब्ध नाहीत. फुटबॉलसाठी केवळ ११ खेळाडू असतील तर दोन संघ कसे तयार करणार? मी कोचेसला खडसावले. हे चालणार नाही, असेही बजावले. आम्हाला
कोचेसच्या कामगिरीची समीक्षा करावी लागेल. अत्याधुनिक तंत्राचा वापर करीत किती खेळाडू घडविले हे पाहिल्यानंतरच यापुढे कोचेसच्या वेतनात वाढ केली जाईल. याशिवाय कोचेसचा स्वत:चा फिटनेस किती आहे यावर भर दिला जाईल. साई कोचेस वेतनवाढ मागतात पण आपण किती मेहनत घेतो याचे आत्मभान बाळगत नसल्याचे मला दिसून आले आहे.’