शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

भारत-ब्रिटन आमनेसामने

By admin | Updated: July 5, 2015 01:15 IST

यजमान बेल्जियमकडून सेमीफायनलमध्ये 0-४ ने मोठा पराभव झाल्यानंतर भारत हॉकी वर्ल्ड लीग सेमीफायनलच्या कास्यपदकावर कब्जा करण्यासाठी ब्रिटनशी दोन हात करील तेव्हा

एंटवर्प : यजमान बेल्जियमकडून सेमीफायनलमध्ये 0-४ ने मोठा पराभव झाल्यानंतर भारत हॉकी वर्ल्ड लीग सेमीफायनलच्या कास्यपदकावर कब्जा करण्यासाठी ब्रिटनशी दोन हात करील तेव्हा त्यांच्यासाठी विजयाचा मार्ग खडतर असणार आहे. सरदारसिंह याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ एफआयएच क्रमवारीत ब्रिटनपासून चार स्थानांनी खाली आहे. ब्रिटनला वर्ल्डचॅम्पियन आॅस्ट्रेलियाने ३-१ ने पराभूत केले होत. काही वेळाच आॅस्ट्रेलियन स्ट्रायकर ब्रिटिश बचावफळी भेदू शकले होते.या सामन्यात भारत गेल्या पराभवातून स्वत:ला सावरू शकतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भारत बेल्जियमकडून एकतर्फी सामन्यात पराभूत झाला व हीच चिंतेची बाब आहे. गेल्या काही वर्षांत दोन्ही देशांतील लढत बरोबरीची होत असे आणि एखाद-दोन गोलच्या अंतराने सामन्याचा निकाल लागायचा. आता कांस्यपदक जिंकण्यासाठी भारतीय संघाला सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक पॉल वॉन ऐस म्हणाले, ‘आम्हाला ब्रिटनविरुद्ध चांगले खेळावे लागणार आहे. आम्हाला जास्त वेळ चेंडू आपल्या ताब्यात ठेवावा लागेल आणि झुंज न देता हा सामना आपल्या हातून जाऊ द्यायला नको याकडे लक्ष द्यावे लागेल.’ ब्रिटन संघ चांगलाच तुल्यबळ आहे आणि गेल्या वर्षी झालेल्या लढतीत निर्णायक क्षणी केलेल्या गोलच्या बळावर त्यांनी भारताला २-१ असे एका गोलने पराभूत केले होते. (वृत्तसंस्था)