शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

टी-२० वर्ल्डकपचा भारत प्रबळ दावेदार

By admin | Updated: February 16, 2016 03:34 IST

श्रीलंकेविरुद्धच्या मालिका विजयामुळे उत्साहित असलेला भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने, मार्च महिन्यात भारताच्या यजमानपदाखाली प्रारंभ

विशाखापट्टणम : श्रीलंकेविरुद्धच्या मालिका विजयामुळे उत्साहित असलेला भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने, मार्च महिन्यात भारताच्या यजमानपदाखाली प्रारंभ होणाऱ्या आयसीसी टी-२० विश्वकप स्पर्धेत, भारत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले आहे. २००७ मध्ये भारताला आपल्या नेतृत्वाखाली टी-२० विश्वकप स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवून देणारा धोनी म्हणाला, ‘टी-२० क्रिकेटमध्ये भारत जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे.’ श्रीलंकेविरुद्ध अखेरच्या लढतीत ९ गडी राखून विजय मिळवल्यानंतर, भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-१ ने सरशी साधली आणि टी-२० मध्ये क्रमवारीतील अव्वल स्थान कायम राखले. विजयानंतर प्रतिक्रिया देताना धोनी म्हणाला,‘विश्वकप स्पर्धा भारताच्या यजमानपदाखाली होत आहे. या स्पर्धेत आमचे फिरकीपटू वर्चस्व गाजवतील. मायदेशात खेळण्याचा आम्हाला लाभ मिळेल. या व्यतिरिक्त आम्हाला येथे आयपीएल खेळण्याचा अनुभव आहे. आयपीएलच्या आठ पर्वांपैकी सात पर्व भारतातच खेळली गेली आहेत. आमच्या विश्वकप संघातील जवळजवळ सर्वच खेळाडू आयपीएलमध्ये खेळतात आणि त्यांना येथे खेळण्याचा चांगला अनुभव आहे.’ भारताच्या यजमानपदाखाली ८ मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या विश्वकप स्पर्धेपूर्वी, गत टी-२० चॅम्पियन श्रीलंका संघाविरुद्धची ही मालिका यजमान संघाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात होती. या मालिकेत खेळणाऱ्या संघातील जास्तीत जास्त खेळाडूंचा आशिया व विश्वकप स्पर्धेसाठी जाहीर झालेल्या संघात समावेश आहे. त्यामुळे खेळाडूंचा फॉर्म तपासण्यासाठी सर्वच खेळाडूंना फलंदाजीची संधी मिळाली आहे, असे धोनीने या वेळी स्पष्ट केले. ‘नव्या चेंडूने मारा करण्यासाठी अश्विनला आमची पहिली पसंती असते. तो प्रतिस्पर्धी फलंदाजांना पुढे सरसावण्यास भाग पाडतो. टी-२० मध्ये अनेकदा फ्लॅट मारा करण्याची गरज असते, पण अश्विन अचूक मारा करतो. अश्विनमुळे आम्हाला वेगवान गोलंदाजांचा मधल्या षटकांमध्ये वापर करण्याची संधी मिळते.’-महेंद्रसिंग धोनीपॉवर प्ले महागात पडला‘पॉवर प्ले’मध्ये चांगली कामगिरी न करता आल्यामुळे, विशेष अनुभव नसलेल्या आमच्या टी-२० संघाला भारताविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. मालिकेत आम्ही चांगला खेळ केला. पहिल्या लढतीत आम्हाला सूर गवसला, पण दुसऱ्या व तिसऱ्या लढतीत आम्हाला चांगली सुरुवात करता आली नाही. रांचीमध्ये आम्ही पहिल्या सहा षटकांमध्ये चांगली गोलंदाजी केली नाही आणि अखेरच्या लढतीत पॉवर प्लेमध्ये चार विकेट गमावल्या. गेल्या दोन सामन्यांत आमच्याकडून चुका झाल्या.’ - दिनेश चंडिमल