शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पाकच्या उपस्थितीमुळे भारताची माघार

By admin | Updated: April 14, 2017 20:23 IST

भारताचा पुरुष हॉकी संघ सलग दुसऱ्या वर्षी मलेशियात आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या सुल्तान जोहोर चषक हॉकी स्पर्धेत सहभागी होणार नाही.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 14 : भारताचा पुरुष हॉकी संघ सलग दुसऱ्या वर्षी मलेशियात आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या सुल्तान जोहोर चषक हॉकी स्पर्धेत सहभागी होणार नाही. पाकिस्तान संघाच्या उपस्थितीमुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे. पाकिस्तान २०१४ च्या चॅम्पियन्स चषकादरम्यान झालेल्या वादाविषयी माफी मागणार नाही तोपर्यंत त्यांच्याविरुद्ध एकही मालिका खेळणार नसल्याच्या भूमिकेवर हॉकी इंडिया ठाम आहे.सुल्तान जोहोर चषक हॉकी स्पर्धा २१ वर्षांखालील गटाची स्पर्धा असून भारताने २०१५ मध्ये या स्पर्धेचे जेतेपद पटकविले होते. या स्पर्धेचा एफआयएचचा थेट संबंध नाही. जानेवारीत हॉकी इंडियाने पाकविरुद्ध एकाही स्पर्धेत खेळणार नाही, अशी घोषणा केली होती. २०१४ च्या चॅम्पियन्स चषकाच्या अंतिम सामन्यादरम्यान खेळाडूंनी दाखविलेली बेशिस्त तसेच अश्लीलहावभाव याबद्दल पाक विनाअट माफी मागेपर्यंत आमचा संघ तुमच्याविरुद्ध खेळणार नसल्याचे भारताने आधीच बजावले आहे.प्रकरण येथेच संपलेले नाही. मागच्यावर्षी लखनौ येथे झालेल्या ज्युनियर हॉकी विश्वचषकाआधी या चषकात आम्ही खेळू नये असा भारताचा डाव असल्याचा आरोप पाकने भारतावर केला होता. भारताने हा आरोप बिनबुडाचा असल्याचे सांगून फेटाळून लावला. पण तरीही पाकने ज्युनियर विश्वचषकात भाग घेतला नाही.हॉकी इंडियाचे प्रवक्ते आर. पी. सिंग म्हणाले,  हॉकी इंडिया आणि आमचे खेळाडू २०१४ चा तो लाजीरवाणा प्रसंग विसरले असले तरी अलीकडे पाकने केलेला आरोप गंभीर आहे. या आरोपामुळे भारताने पाकविरुद्ध खेळायचे नाहीच अशी ठामभूमिका घेतली. सुल्तान जोहोर चषक हॉकी स्पर्धेसाठी संघ पाठवायचा नाही या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. पाकने विनाअट लेखी माफी मागितल्याशिवाय आम्ही त्यांच्यााविरुद्ध कुठलाही सामना खेळणार नाही. सुल्तान जोहोर चषक ही एफआयएचची अधिकृत स्पर्धा नसल्याने स्पर्धा खेळणे अनिवार्य नाही, असेही सिंग यांनी स्पष्ट केले.