शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

भारताची भिस्त फलंदाजांवर

By admin | Updated: August 15, 2014 00:27 IST

विराट कोहलीने सलग दुसऱ्या दिवशीही सरावामध्ये घाम गाळला. प्रशिक्षक डंकन फ्लेचरही यावेळी त्याला मार्गदर्शन करीत असल्याचे चित्र दिसले

लंडन : विराट कोहलीने सलग दुसऱ्या दिवशीही सरावामध्ये घाम गाळला. प्रशिक्षक डंकन फ्लेचरही यावेळी त्याला मार्गदर्शन करीत असल्याचे चित्र दिसले. उजव्या यष्टिबाहेरचे चेंडू खेळण्याचा कोहलीने कसून सराव करीत शनिवारपासून प्रारंभ होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले. गत दोन कसोटी सामन्यांचा अनुभव लक्षात घेता उजव्या यष्टिबाहेरचा चेंडूवरचा फटका खेळण्याचा मोह भारतीय संघासाठी आत्मघातकी ठरला आहे. जेम्स अ‍ॅन्डरसन व स्टुअर्ट ब्रॉड यांनी भारतीय फलंदाजांच्या स्विंग व सीम मारा खेळण्याचा उणिवा स्पष्ट केल्या. मॅन्चेस्टरमध्ये भारताचे दोन्ही डाव ९० षटकांत आटोपले. यावरुन भारतीय संघ एकाच दिवशी दोनदा बाद झाल्याचे स्पष्ट झाले. मालिकेत २-१ ने पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाला शुक्रवारपासून प्रारंभ होणाऱ्या पाचव्या व अखेरच्या कसोटी सामन्यात यजमान इंग्लंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. भारतीय संघ मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. भारताची भिस्त फलंदाजांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. भारताच्या प्रत्येक फलंदाजाने इंग्लंडच्या माऱ्याला यशस्वपणे तोंड देण्याचे धैर्य दाखविले तर भारताला अनुकुल निकाल मिळविता येईल. मुरली विजय व गौतम गंभीर यांच्यावर संघाला चांगली सुरुवात करुन देण्याची जबाबदारी आहे. गेल्या आठ कसोटी सामन्यांत भारताला एकदाही अर्धशतकी सलामी मिळाली नाही. त्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. विजयने या मालिकेत सुरुवातीपासून खेळपट्टीवर तळ ठोकण्याची तयारी दर्शविली आहे. अनुभवी गंभीरने जर लौकिकाला साजेशी कामगिरी केली तर इंग्लंडच्या गोलंदाजांना यश मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागेल.भारताची आघाडीची फळी अपयशी ठरत असताना कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मधल्या फळीतील व तळाच्या फलंदाजांच्या साथीने डाव सावरण्याचे धैर्य दाखविले आहे. भारताने या कसोटी सामन्यात पाच गोलंदाजांना खेळविण्याचा निर्णय घेतला तर आर. अश्विन व भुवनेश्वर कुमार यांच्याकडून फलंदाजीतही उपयुक्त योगदान मिळेल, अशी आशा आहे. सन्माजनक धावसंख्येची मजल मारल्यानंतर गोलंदाजांना त्यांची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल. लॉर्डस्वर कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना ७४ धावांच्या मोबदल्यात ७ बळी घेण्याची कामगिरी करणाऱ्या ईशांत शर्माच्या पुनरागमनामुळे संघाचे मनोधैर्य उंचावले आहे. त्याला भुवनेश्वर कुमारची योग्य साथ लाभेल अशी आशा आहे. त्याच्या जोडीला वरुण अ‍ॅरोनसारख्या वेगवान गोलंदाजाला इंग्लंडच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याची संधी राहिल. ओव्हलच्या खेळपट्टीवर अखेरच्या दोन दिवसांमध्ये फिरकीपटूंची कामगिरी महत्त्वाची ठरण्याची शक्यता लक्षात घेता अश्विनला छाप सोडण्याची संधी आहे.