शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

तिरंदाजी विश्वचषकात भारताला सुवर्णपदक

By admin | Updated: May 21, 2017 01:25 IST

येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत शनिवारी भारताच्या पुरु ष संघाने कम्पाऊंड प्रकारात ‘गोल्ड’न कामगिरी केली. अभिषेक वर्मा, राजू चिन्ना श्रीधर आणि पदार्पण

शांघाय : येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत शनिवारी भारताच्या पुरु ष संघाने कम्पाऊंड प्रकारात ‘गोल्ड’न कामगिरी केली. अभिषेक वर्मा, राजू चिन्ना श्रीधर आणि पदार्पण करणारा अमनजितसिंग यांच्या या त्रिकुटाने जबरदस्त कामगिरीच्या बळावर दहाव्या रँकिंगवरील कोलंबियाचा अंतिम सामन्यात पराभव केला. चुरशीच्या लढतीत भारताने कोलंबियाला २२६-२२१ अशा गुणफरकाने धूळ चारली.सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी बहारदार कामगिरी केली. अभिषेक वर्मा, राजू चिन्ना श्रीधर आणि अमनजितसिंग यांनी अखेरच्या क्षणी निर्णायक गुण नोंदविले. भारताने पहिला सेट ५८-५७ असा जिंकला. नंतर तिन्ही सेटमध्येदेखील बाजी मारली. दरम्यान, तिसरा सेट कोलंबियाच्या खेळाडूंनी ५२-५२ असा ‘टाय’ केला. पराभूत कोलंबिया संघात कामिलो आंद्रेस कार्डोना, जोस कार्लोस ओस्पिना आणि डॅनियल मुनोज यांचा समावेश होता.त्याआधी भारताने व्हिएतनाम, इराण आणि अमेरिकेला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. वर्माने प्रथमच सांघिक सुवर्ण जिंकले. विश्वचषकात त्याचे हे दुसरे सुवर्ण ठरले. तो म्हणाला, ‘येथे दाखल होण्याआधी आम्ही बारीकसारीक गोष्टींचा अभ्यास केला. आठवडाभर सरावादरम्यान गुण वाढविण्यावर भर देत होतो.’ २०१४ च्या इंचियोन आशियाडमध्ये त्याला रौप्यावर समाधान मानावे लागले होते.दुसरीकडे मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत दिल्लीचा २७ वर्षांचा अभिषेक वर्मा आणि ज्योती सुरेखा वेन्नम या जोडीचा कोरियाने १५३-१५१ अशा गुणफरकाने पराभव केला होता. आता कांस्यपदकासाठी ही जोडी अमेरिकेशी भिडणार आहे.दरम्यान, रिओ आॅलिम्पिकनंतर पहिल्यांदाच मोठ्या स्पर्धेत सहभागी झालेल्या अतानु आणि दीपिका कुमारी यांनी रिकर्व्ह प्रकारात निराशा केली. उपांत्यपूर्व फेरीत अतानुचा नेदरलँडच्या स्टीव्ह विलेयरने पराभव केला. दीपिकालाही पराभवाचा सामना करावा लागला. (वृत्तसंस्था)