शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

भारताची प्रथम फलंदाजी - रहाणे, पंड्या आऊट, पंत इन

By admin | Updated: July 9, 2017 20:59 IST

एकमेव टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार कार्लोस ब्रेथवेटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमतकिंगस्टन, दि. 9 - एकमेव टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार कार्लोस ब्रेथवेटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात युवा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतला संधी देण्यात आली आहे. तर वेस्ट इंडिजविरोधातील एकदिवसीय मालिकेत मालिकावीर ठरलेल्या मुंबईकर अजिंक्य रहाणेची निवड करण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे हार्दिक पंड्यालाही आराम देण्यात आला आहे.

या वर्षीच्या सुरूवातीला इंग्लंडविरोधात बंगळुरू येथे झालेल्या टी-20 सामन्यात पंतला संधी मिळाली होती. धोनीनंतर भविष्यातील यष्टीरक्षक म्हणून पंतकडे पाहिलं जात आहे.

पाच सामन्यांची वन-डे मालिका ३-१ अशी जिंकणाऱ्या भारताला टी-२० जिंकून मालिकेचा शानदार समारोप करायचा आहे. यासाठी ख्रिस गेलच्या फलंदाजीवर अंकुश लावावा लागेल. खराब फॉर्म आणि जखमांशी झुंज देणारा गेल १५ महिन्यांनंतर राष्ट्रीय संघात परतला. आयपीएलमध्येहीतो अपयशी ठरला होता.

विंडीज संघ या प्रकारात सध्या विश्वविजेता असून संघात गेलसह मार्लोन सॅम्युअल्स, सुनील नारायण, सॅम्युअल बद्रीसारखे मॅचविनर आहेत. टी-२० चा तज्ज्ञ कार्लोस ब्रेथवेट कर्णधार असेल. मागच्या वर्षी फ्लोरिडात भारताविरुद्धच्या टी-२० त ४९ चेंडूंत शतक झळकविणारा एव्हिन लुईस याचादेखील संघात समावेश आहे. या लढतीसाठी भारतीय संघ डावपेच व संघ यात बदल करू शकतो. रोहितच्या अनुपस्थितीत कोहली सलामीला खेळण्याची शक्यता आहे. युवा ऋषभ पंतला दौऱ्यात प्रथमच संधी दिली जाईल. भविष्यातील वन-डे यष्टिरक्षक म्हणून पंतकडे पाहिले जात आहे. कुलदीप यादवदेखील संघात असेल. तो वेगवान भुवनेश्वर व उमेश यादवनंतर फिरकीची बाजू सांभाळेल. विंडीजच्या आक्रमणाची भिस्त नारायण व बद्रीवर राहील. नारायण फलंदाजीत सलामीला खेळू शकतो.

उभय संघ असे...भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, दिनेश कार्तिक ऋषभ पंत, महेंद्रसिंह धोनी, केदार जाधव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन आश्विन, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आणि मोहम्मद शमी.वेस्ट इंडीज : कार्लोस ब्रेथवेट (कर्णधार), सॅम्युअल बद्री, ख्रिस गेल, एव्हिन लुईस, सुनील नारायण, किरॉन पोलार्ड, रोवमॅन पॉवेल, मार्लोन सॅम्युअल्स, जेरोम टेलर, चाडविक वॉल्टन, केसरिक विल्यम्स.