शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
4
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
5
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
7
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
8
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
9
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
10
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
11
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
12
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
13
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
14
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
15
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
16
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
17
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
18
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
19
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
20
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट

रहाणेसारखा ‘संयमी’ कर्णधार हे टीम इंडियाचे नशीब : चॅपेल

By admin | Updated: March 30, 2017 01:26 IST

‘अजिंक्य रहाणेसारखा संयमी वृत्तीचा कर्णधार उपलब्ध असणे हे टीम इंडियाचे नशीब म्हणावे लागेल. रहाणे स्वत:च्या

नवी दिल्ली : ‘अजिंक्य रहाणेसारखा संयमी वृत्तीचा कर्णधार उपलब्ध असणे हे टीम इंडियाचे नशीब म्हणावे लागेल. रहाणे स्वत:च्या स्टाईलने संघाचे नेतृत्व करतो, तर कोहलीच्या नेतृत्वाची स्टाईल त्यापेक्षा वेगळी आहे. अशा दोन्ही वृत्तीचे कर्णधार एकाच वेळी संघात असल्याने टीम इंडिया भाग्यवान आहे, असे आॅस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी ‘क्रि कइन्फो’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.धरमशाला कसोटीत जखमी विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. भारताने ही कसोटी आठ गड्यांनी जिंकून मालिका २-१ ने खिशात घातली. कसोटीत रहाणेने संयमाने नेतृत्व केले, शिवाय दुसऱ्या डावात आक्र मक फलंदाजी करीत विजयावर शिक्कामोर्तब केले.चॅपेल म्हणाले, ‘‘रहाणेने धरमशाला कसोटीत कर्णधार म्हणून खरोखर उत्कृष्ट कामगिरी केली. खऱ्या कर्णधाराची नेतृत्वाची पद्धत आपल्यापेक्षा खूप वेगळी असल्याची जेव्हा कल्पना तुम्हाला असते, अशा वेळी त्याची जागा भरून काढण्याचे मोठे आव्हानदेखील असते. आपण काय करावे? मुख्य कर्णधाराचीच पद्धत कायम ठेवून नेतृत्व करावे, की स्वत:च्या स्टाईलने नेतृत्व करावे, हा प्रश्न असतो. रहाणेने अतिशय सोप्या पद्धतीने सामना पार पाडला. शिवाय जिंकून दाखविला. यातून त्याच्या नेतृत्वगुणांचा परिचय घडला.’’रहाणेने दुसऱ्या डावात भारताचे दोन गडी स्वस्तात बाद झाल्यानंतरही आॅस्ट्रेलियन गोलंदाजांना पुनरागमनाची संधी न देता, पहिल्या चेंडूपासून आक्रमक फटकेबाजी केली. त्याने २७ चेंडूंत नाबाद ३८ धावा ठोकल्या. रहाणे कर्णधार म्हणून संयमी आहे. तो आपल्या फलंदाजीतून आक्र मकपणा दाखवून देतो. तुम्ही काय करीत आहात, यावर संघातील खेळाडूंचा तुमच्यावर पूर्ण विश्वास हवा आणि तुम्हाला फक्त चांगली खेळी साकारण्याची गरज असते. संघाचे मनोधैर्य यातून आपोआप उंचावते. कोहली आणि रहाणे यांचे कौशल्य भिन्न आहे. पण धरमशालात रहाणेने ज्या पद्धतीने नेतृत्व केले ते वाखाणण्याजोगे आहे, असेही चॅपेल म्हणाले.(वृत्तसंस्था)