शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

धोनीच्या घरच्या मैदानावर भारताचा पराभव

By admin | Updated: October 26, 2016 22:42 IST

न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत भारतावर पराभवाची नामुष्की ओढावली आहे.

ऑनलाइन लोकमतरांची, दि. 26 - न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत भारतावर पराभवाची नामुष्की ओढावली आहे. न्यूझीलंडनं दिलेल्या 260 धावांचं आव्हान पार करताना भारताची अक्षरशः धांदल उडाली आहे. न्यूझीलंडनं भारतावर 19 धावांनी विजय मिळवला आहे. कर्णधार धोनीला घरच्या मैदानावरच पराभव स्वीकारावा लागला आहे. किवींच्या आक्रमक खेळीपुढे भारताचा निभाव लागला नाही.भारताकडून रहाणेनं सर्वाधिक 57 धावा केल्या. तर कोहली 45 धावांशिवाय चमकदार खेळी करू शकला नाही. कोहली आणि रहाणेच्या 79 धावांच्या भागीदारीमुळे भारताचा पाया सुरुवातीला मजबूत होता. मात्र त्यानंतर भारतानं लागोपाठ बळी टाकण्यास सुरुवात केल्यानं भारताच्या पदरी पराभव आला. शर्मा 11, धोनी 11, पटेल 38, पांडेय 12, पंड्या 9 धावा काढून तंबूत परतले. तर जाधवला साधा भोपळाही फोडता आला नाही. एकंदरीतच भारतानं आज खराब कामगिरीचं प्रदर्शन केलं आहे. तर तत्पूर्वी न्यूझीलंडने 50 षटकांत सात बाद 260 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडनं दमदार सुरुवात केली होती. मात्र भारताच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडला 260 धावांवरच त्यांना रोखलं होतं. सलामीवीर गुप्टील आणि लॅथमने पहिल्या विकेटसाठी 96 धावांची खेळी केली. मात्र न्यूझीलंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना दाद न देता फटकेबाजी सुरूच ठेवली होती. हार्दिक पांडयाच्या गोलंदाजीवर गुप्टीलने (72) धावांवर यष्टीरक्षक धोनीकडे झेल दिला. लॅथेमला (39) धावांवर अक्षर पटेलने रहाणेकरवी झेलबाद केले. कर्णधार विल्यमसन (41) धावांवर अमित मिश्राच्या गोलंदाजीवर बाद झाला. नीशॅमला (6) धावांवर अमित मिश्राने कोहलीकरवी झेलबाद केले. पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंड 2-2वर आला आहे.