शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा मलेशियाविरुद्ध निर्णायक सामना

By admin | Updated: May 5, 2017 01:05 IST

अझलान शाह स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी एका विजयाची आवश्यकता असलेला भारतीय संघ शुक्रवारी पूर्ण

इपोह : अझलान शाह स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी एका विजयाची आवश्यकता असलेला भारतीय संघ शुक्रवारी पूर्ण आत्मविश्वासाने मलेशियाविरुद्ध लढेल. गतविजेत्या आॅस्टे्रलियाला अंतिम फेरीसाठी केवळ बरोबरीही पुरेशी ठरणार असून, त्यांचा सामना जपानविरुद्ध आहे. एकूणच आॅस्टे्रलियाचा लौकिक पाहता त्यांचा जपानविरुद्धचा विजय केवळ औपचारिकता आहे. त्याच वेळी मलेशियाविरुद्ध एकही चूक भारताला खूप महागडी ठरू शकते. जर, भारताला अनपेक्षित निकालाला सामोरे जावे लागले, तर मात्र त्याचा फायदा ब्रिटनला होईल आणि त्यांचा संघ अंतिम फेरीत पोहोचेल. ब्रिटनचा अखेरचा लीग सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, भारतीय संघ स्पर्धेतील अखेरचा लीग सामना खेळणार असल्याने अंतिम फेरीचे एकूण गणित भारतीयांना माहीत असेल. मात्र, त्याच वेळी गोलसरासरी चांगली असणे आवश्यक असेल, तर अशा परिस्थितीमध्ये स्ट्रायकर्सवर अधिक जबाबदारी येईल. आतापर्यंतच्या सामन्यात मनदीपसिंग आणि आकाशदीपसिंग यांनीच लक्षवेधी कामगिरी केली असून, मनदीपने जपानविरुद्ध शानदार हॅट्ट्रिक नोंदवली होती. त्याच वेळी जास्तीत जास्त गोल नोंदविण्यासाठी भारताची मदार रूपिंदरपालसिंग आणि हरमनप्रीतसिंग या पेनल्टी कॉर्नर स्पेशालिस्टवर असेल. दरम्यान, जागतिक क्रमवारीत आपल्याहून १६ स्थानांनी पिछाडीवर असलेल्या जपानविरुद्ध भारताला झुंजावे लागले होते. त्यात अंतिम सामन्यात धडक मारण्यासाठी निर्णायक असलेल्या सामन्यात मलेशियासारख्या संघाविरुद्ध खेळावे लागणार असल्याने प्रशिक्षक रोलंट ओल्टमन्स यांनी सर्व खेळाडूंना लक्षपूर्वक खेळण्याच्या सूचना दिल्या आहेत. (वृत्तसंस्था)मलेशियाचा संघ खूप चांगला आहे. कोणत्याही प्रतिस्पर्धी संघाला गृहीत धरता येणार नाही. भलेही जपानने आम्हाला कडवे आव्हान दिले; परंतु आता आम्ही कोणतेही आव्हान घेण्यास सज्ज आहोत.- रोलंड ओल्टमन्स, प्रशिक्षक, भारतटीम इंडियाला  विजय आवश्यकचस्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आलेला यजमान मलेशिया आपल्या प्रतिष्ठेसाठी भारताविरुद्ध दोन हात करेल. जपानविरुद्धच्या सलामी सामन्यात बरोबरी साधल्यानंतर मलेशियाला सलग तीन सामन्यांत पराभव पत्करावा लागला होता. बुधवारी न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवानंतर कांस्यपदकाच्या शर्यतीतूनही मलेशियाचे आव्हान संपुष्टात आले. त्यामुळे स्पर्धेची सांगता विजयाने करण्यासाठी मलेशिया भारताला टक्कर देईल. विश्वविजेता आॅस्टे्रलिया सर्वाधिक १० गुणांसह अव्वल स्थानी आहे. यानंतर भारत, ब्रिटन आणि न्यूझीलंड प्रत्येकी ७ गुणांसह आव्हान टिकवून आहेत. परंतु, गोलसरासरीच्या जोरावर भारताने द्वितीय स्थान पटकावले असून, अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला मलेशियाविरुद्ध विजय आवश्यक आहे. जर न्यूझीलंडने ब्रिटनला नमवले आणि भारत पराभूत झाला, तर न्यूझीलंड अंतिम फेरीत प्रवेश करेल.