शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय महिलांचा दणदणीत विजय

By admin | Updated: November 11, 2016 00:59 IST

डावखुरी फिरकी गोलंदाज राजेश्वरी गायकवाड (४/२१) आणि एकता बिस्त (३/१४) यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात ६ विकेट्सने

विजयवाडा : डावखुरी फिरकी गोलंदाज राजेश्वरी गायकवाड (४/२१) आणि एकता बिस्त (३/१४) यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात ६ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. यासह भारताने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.गोकराजू लिआला गंगाराजू एसीए क्रिकेट मैदानावर झालेल्या या सामन्यात विंडीज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. परंतु, भारतीयांच्या अचूक माऱ्यापुढे त्यांचा निर्णय चुकीचा ठरला. राजेश्वरी आणि एकता यांनी टिच्चून मारा करताना विंडीजच्या फलंदाजांना स्थिरावू दिले नाही. विंडीजचा डाव ४२.४ षटकांत केवळ १३१ धावांत संपुष्टात आला.यानंतर, लक्ष्याचा पाठलाग करण्यास उतरलेल्या भारतीय महिलांची सुरुवातही अडखळती झाली. स्म्रिती मंधना (७), मोना मेशरम (२), दीप्ती शर्मा (१६) आणि हरमनप्रीत कौर (१) झटपट परतल्याने भारतीय संघाची एकवेळ १६.३ षटकांत ४ बाद ३६ धावा अशी बिकट अवस्था झाली होती. या वेळी विंडीजने जबरदस्त नियंत्रण मिळवले होते.परंतु, कर्णधार मिताली राजने आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर भारताची गाडी रुळावर आणली. दुसऱ्या टोकाकडून वेदा क्रिष्णमूर्तीनेही मितालीला चांगली साथ देताना निर्णायक नाबाद अर्धशतक झळकावले. वेदाने ७० चेंडंूत ४ चौकार व २ षटकार खेचताना नाबाद ५२ धावा काढल्या. तर, मितालीने ९१ चेंडंूत ६ चौकारांसह नाबाद ४६ धावांची खेळी केली. या दोघींनी पाचव्या विकेटसाठी नाबाद ९७ भागीदारी करून विंडीजच्या आशा संपुष्टात आणल्या. भारताने ३९.१ षटकांत ४ फलंदाज गमावून १३३ धावा काढल्या. तत्पूर्वी, राजेश्वरी आणि एकता यांनी ठराविक अंतराने दिलेल्या धक्क्यानंतर विंडीजची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. यष्टिरक्षक फलंदाज मेरिस्सा अग्युल्लेरिया हिने नाबाद राहताना सर्वाधिक ४२ धावा काढले. तर, सलामीवीर हायली मॅथ्यूसने २४ धावांची खेळी केली. (वृत्तसंस्था) संक्षिप्त धावफलक :वेस्ट इंडीज : ४२.२ षटकांत सर्व बाद १३१ धावा (मेरिस्सा अग्युल्लेरिया ४२, हायली मॅथ्यूसने २४; राजेश्वरी गायकवाड ४/२१, एकता बिस्त ३/१४) पराभूत वि. भारत : ३९.१ षटकांत ४ बाद १३३ धावा (वेदा क्रिष्णमूर्ती नाबाद ५२, मिताली राज नाबाद ४६; शकेरा सेलमन २/११)