शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय महिलांकडून वेल्स पराभूत

By admin | Updated: December 18, 2015 03:14 IST

भारतीय महिला खेळाडूंनी एफ गटातील साखळी सामन्यात वेल्स संघाचा ३-० गेमने पराभव करून २० व्या राष्ट्रकुल अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

सुरत : भारतीय महिला खेळाडूंनी एफ गटातील साखळी सामन्यात वेल्स संघाचा ३-० गेमने पराभव करून २० व्या राष्ट्रकुल अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे भारतीय पुरुष संघाने आयर्लंडला ३-० गेमने नमविले. भारतीय महिलांचा उपांत्य फेरीत सामना इंग्लंडविरुद्ध होईल. भारतीय टेबल टेनिस महासंघाच्या वतीने सुरत येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय इंडोन हॉलमध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेतील महिलांच्या गटात भारताच्या मौमा दासने वेल्सच्या मेगन फिलिप्सचा ९-११, १२-१०, ११-६, ११-३ गुणांनी पराभव केला. दुसऱ्या सामन्यात मनिका बत्राने चारलोत्ते केरेला ११-७, ११-८, ११-८ असे सरळ तीन सेटमध्ये पराभूत केले. तिसऱ्या लढतीत शामिनीने च्लोये थॉमसला ११-९, १०-१२, ११-४, ११-२ असे नमविले. पुरुषांच्या गटात पहिल्या सामन्यात भारतीय संघाने आयर्लंडला ३-० ने पराभूत केले. भारताच्या सौम्यजीत घोषने आयर्लंडच्या जॅक विल्सनला ११-५, ११-६, ११-४ असे सरळ तीन सेटमध्ये पराभूत केले. दुसऱ्या सामन्यात अ‍ॅन्थोनी अमलराजने अ‍ॅश्ले रॉबीन्सनला ११-१३, ११-४, ११-७, ११-९ असे नमविले. तिसऱ्या लढतीत साथीयाने ओव्हेन कथकर्टला ११-५, ११-३, ११-४ असे पराभूत केले.भारतीय पुरुषांनी दुसऱ्या साखळी सामन्यात श्रीलंकेला ३-० ने नमविले. पहिल्या गेममध्ये हरमीतने रोहन सीरीसेनाला ११-४, ११-१, ११-५ असे पराभूत केले. दुसऱ्या सामन्यात सौम्यजीतने जयसंका डी-सील्वाला ११-६, ११-८, ११-८ असे नमविले. तिसऱ्या सामन्यात अ‍ॅन्थोनी अमलराजने चमिरा गिनीगेला ११-४, ११-४, ११-४ असे पराभूत केले. महिलांच्या गटात सिंगापूर संघाने श्रीलंका संघाला ३-० ने नमविले. उपांत्य फेरीत श्रीलंकेचा सामना वेल्स संघाविरुद्ध होईल.(वृत्तसंस्था)