शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

पाकच्या तुलनेत भारतीय संघ अधिक मजबूत : इरफान

By admin | Updated: February 11, 2015 01:38 IST

गतचॅम्पियन भारतीय संघ परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघापेक्षा अधिक मजबूत असून, विश्वकप स्पर्धेत १५ फेब्रुवारी रोजी खेळल्या

नवी दिल्ली : गतचॅम्पियन भारतीय संघ परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघापेक्षा अधिक मजबूत असून, विश्वकप स्पर्धेत १५ फेब्रुवारी रोजी खेळल्या जाणा-या लढतीत टीम इंडिया नक्कीच बाजी मारेल, असे मत भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने व्यक्त केले. इरफान म्हणाला, ‘पाकच्या तुलनेत भारतीय संघ दमदार असल्यामुळे भारतीय संघाची कामगिरी उल्लेखनीय ठरेल. या लढतीत भारतच विजय मिळविणार, असा मला विश्वास आहे.’ २००७च्या विश्वकप स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारा इरफान पुढे म्हणाला, ‘‘दडपणाखाली दर्जेदार कामगिरी करणे यशाचे गमक ठरेल. विश्वकप स्पर्धेत अधिक दडपण असते. सर्वांची नजर तुमच्यावर असते. प्रत्येक व्यक्ती याबाबत चर्चा करतो. ही स्पर्धा चार वर्षांतून एकदा होत असल्यामुळे दडपण चारपट अधिक असते.’’ इरफान पुढे म्हणाला, ‘‘ज्या वेळी मी विंडीजमध्ये होतो, त्या वेळी आमची तयारी चांगली झाली असल्याचे आम्हाला वाटत होते. पण, आम्हाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. दडपण नेहमीच असते. पण, त्यानंतरही चमकदार कामगिरी करणे आवश्यक असते.’’टी-२० विश्वकप स्पर्धेत भारताच्या विजयी संघाचा सदस्य असलेल्या पठाणने पाकिस्तानविरुद्धच्या संस्मरणीय लढतीची आठवण करताना सांगितले, ‘भारत-पाक लढत नेहमीच विशेष असते. त्या वेळीही दडपण होते. विश्वकप स्पर्धेत दडपण अधिक वाढते. दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वकप स्पर्धेत भारत-पाक सामना टाय झाला होता. आम्ही दडपण झुगारण्यासाठी प्रयत्नशील होतो. धोनी त्या वेळी कर्णधार होता. सर्व काही नवे होते. पाकविरुद्धच्या लढतीपूर्वी केवळ पाच मिनिटांची बैठक झाली होती. आम्ही दडपण न बाळगता केवळ खेळाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करीत होतो. पण, अंतिम सामन्यात दडपण येतेच. मिस्बाहने तो फटका मारण्यापूर्वी सामना बरोबरीत होता. मी त्या लढतीत तीन बळी घेतले होते.’’सचिन तेंडुलकरयुगाची आठवण करताना इरफान म्हणाला, ‘‘विश्वकप स्पर्धा असो किंवा नसो, पण भारतीय संघ ज्या वेळी मैदानात उतरेल, त्या वेळी सचिनची उणीव नक्की भासेल. १९९२पासून सचिन सर्वच विश्वकप स्पर्धेत सहभागी झाला आहे. विश्वकप स्पर्धेच्या इतिहासात त्याने सर्वाधिक धावा फटकाविल्या आहेत. सचिनबाबत बोलण्यासाठी मी खूप लहान व्यक्ती आहे.’’ (वृत्तसंस्था)