शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

विश्व हॉकी लीगसाठी भारतीय संघ जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2015 01:31 IST

बेल्जियममधील एंटवर्पमध्ये २० जून ते ५ जुलै या कालावधीत आयोजित विश्व लीग सेमीफायनलसाठी भारताने मंगळवारी १८ सदस्यांचा समावेश असलेल्या पुरुष हॉकी संघाची घोषणा केली.

नवी दिल्ली : बेल्जियममधील एंटवर्पमध्ये २० जून ते ५ जुलै या कालावधीत आयोजित विश्व लीग सेमीफायनलसाठी भारताने मंगळवारी १८ सदस्यांचा समावेश असलेल्या पुरुष हॉकी संघाची घोषणा केली. ड्रॅग फ्लिकर रुपिंदरपाल सिंग व मिडफिल्डर उथप्पासह चार प्रमुख खेळाडूंना या संघात स्थान देण्यात आलेले नाही. रुपिंदर व उथप्पा यांच्या व्यतिरिक्त स्ट्रायकर मनदीप सिंग व सतबीर सिंग यांना वगळण्यात आले. या चारही खेळाडूंना गेल्या महिन्यात मलेशियातील इपोहमध्ये खेळल्या गेलेल्या अजलन शाह कप व त्यानंतर जपानविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघात स्थान मिळाले होते. भारतीय संघ अजलन शाह कप स्पर्धेत तिसऱ्या स्थानी होता, तर जपानविरुद्धच्या मालिकेत भारताने ३-० ने विजय मिळवला होता. बचाव फळीतील जसजितसिंग कुलार व गुरमेल सिंग, मिडफिल्डर ललित उपाध्याय व स्ट्रायकर युवराज वाल्मीकी यांचे संघात पुनरागमन झाले आहे. जपानविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताने चाचणी घेताना २४ खेळाडूंचा समावेश असलेल्या संघाची निवड केली होती. त्यात गुरमेल, जसजित, ललित व युवराज यांचा समावेश होता.आतापर्यंत २१६ आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा मिडफिल्डर सरदार सिंगला कर्णधारपदी कायम राखण्यात आले आहे तर गोलकिपर पी.आर. श्रीजेशची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली. हॉकी विश्व लीग सेमीफायनलमध्ये १० संघांचा समावेश आहे. सहभागी संघाची दोन गटात विभागणी करण्यात आली असून ‘अ’ गटात भारतासह फ्रान्स, पोलंड, परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान व बलाढ्य आॅस्ट्रेलिया या संघाचा समावेश आहे. ‘ब’ गटात चीन, आयर्लंड, ब्रिटन व यजमान बेल्जियम हे संघ आहे. भारताची सलामी लढत २० जून रोजी फ्रान्सविरुद्ध होणार आहे. आॅलिम्पिकसाठी यापूर्वीच पात्रता गाठणाऱ्या भारतीय संघाने या स्पर्धेसाठी जोरदार तयारी केली आहे. खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करतील व प्रतिस्पर्धी संघांपुढे आव्हान निर्माण करतील, असा विश्वास संघाचे मुख्य प्रशिक्षक पॉल वान ऐस यांनी व्यक्त केला आहे. ऐस म्हणाले, ‘संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. नुकत्याच जपानविरुद्धच्या मालिकेत ३-० ने विजय मिळवत भारतीय संघाने आत्मविश्वास उंचावलेला असल्याचे सिद्ध केले आहे. भारताला आता बलाढ्य संघांच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार असून, खेळाडू व्यूहरचनेवर भर देत आहेत. भारताला कठीण गट मिळाला असला तरी खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज आहेत. आॅस्ट्रेलियाच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी संघ उत्सुक आहे. (वृत्तसंस्था)भारतीय संघगोलकिपर : पी. आर. श्रीजेश (उपकर्णधार), हरज्योत सिंग. बचाव फळी : मनप्रीत सिंग, बीरेंद्र लाकडा, कोठाजित सिंग, वी. आर. रघुनाथ, जसजित सिंग, गुरमेल सिंग. मधली फळी : गुरबाज सिंग, धरमवीर सिंग, सरदार सिंग (कर्णधार), चिंगलेनसना सिंग, ललित उपाध्याय. आघाडीची फळी : एस. व्ही. सुनील, निक्किन थिम्मया, युवराज वाल्मीकी, आकाशदीप सिंग, रमनदीप सिंग.