शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

दूतावासातून उपाशीपोटी परतले भारतीय खेळाडू

By admin | Updated: August 17, 2016 03:58 IST

सलग अपयशामुळे हताश आणि निराश झालेल्या भारतीय आॅलिम्पिक पथकातील काही खेळाडू भारतीय दूतावासात स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात सहभागी झाले.

रिओ : सलग अपयशामुळे हताश आणि निराश झालेल्या भारतीय आॅलिम्पिक पथकातील काही खेळाडू भारतीय दूतावासात स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात सहभागी झाले. या कार्यक्रमानंतर त्यांची केवळ भुईमूगाच्या शेंगा खायला घालून बोळवण करण्यात आली. हॉकी संघातील एक सदस्य नाराज होता. नाराजीच्या सूरातच तो म्हणाला,‘आम्हाला खायला केवळ भुईमूगाच्या शेंगा मिळाल्या. आम्हाला रात्रीचे भोजन दिले जाईल, अशी अपेक्षा होती, पण बीअर, सॉफ्ट ड्रिंक आणि भुईमूगाच्या शेंगा दिल्याने घोर निराशा झाली.आम्ही क्रीडाग्राममध्येही रात्रीचे जेवण न घेण्याचा निर्णय आधीच केल्यामुळे आम्हाला उपाशीपोटी परत यावे लागले. यामुळे फारच वाईट वाटले.’ब्राझीलच्या भारतीय दूतावासाने आयोजित केलेला हा ७० वा स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा कार्यक्रम फार मोठा नव्हता. स्पर्धेत भारतीय खेळाडू व्यस्त असताना सायंकाळी ७ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यावेळी बॅडमिंटन आणि बॉक्सिंग सामन्यांच्या वृत्तांकनात व्यस्त होते. पुरुष आणि महिला हॉकी संघ कार्यक्रमाला गेले. कार्यक्रमाचे निमंत्रण क्रीडासचिव राजीव यादव यांच्याकडून आले होते.(वृत्तसंस्था)