लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : दुसऱ्या आशियाई कॅडेट तायक्वांडो चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या पाच खेळाडूंनी कांस्य पदकांची कमाई केली. व्हिएतनामच्या होची मिन्ह शहरात ५ ते ८ जून या कालावधीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.देशासाठी कांस्य विजेत्या मुलींमध्ये मृणाल किशोर वैद्य तसेच मुलांमध्ये आदित्य चौहान (६५ किलो), अनिल (४१ किलो), देवांग शर्मा (६१ किलो) आणि अनिस दास तालुकदार(६५ किलोवरील गट) यांचा समावेश आहे. आशियाई स्पर्धेत भारतीय संघात २४ खेळाडू आणि तीन कोचेसचा समावेश होता. अन्य खेळाडूंनी देखील चमकदार कामगिरी केली . तथापि पदके जिंकण्यात त्यांना अपयश आले. या स्पर्धेतील कामगिरीमुळे भारतीय खेळाडूंचे मनोबल उंचावले असून आगामी आॅगस्टमध्ये आयोजित विश्व कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये चमकदार कामगिरीसाठी सर्व खेळाडू सज्ज होत आहेत.
भारताला पाच कांस्य पदके
By admin | Updated: June 10, 2017 04:39 IST