भारत विम्बल्डन
By admin | Updated: June 26, 2014 23:00 IST
सानिया, बोपन्ना विजयी
भारत विम्बल्डन
सानिया, बोपन्ना विजयीलंडन : भारताची अनुभवी टेनिसपटू सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना यांनी आपापल्या जोडीदारांसह विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धेच्या दुसर्या फेरीत प्रवेश मिळविला़ सानियाने झिम्बाब्वेच्या कारा ब्लॅकसह खेळताना महिला दुहेरीत रशियाची ज्वोनारेव्हा वेरा आणि स्वीत्झर्लंडची मार्टिना हिंगिस यांच्यावर सरळ सेटमध्ये ६-२, ६-४ अशी मात करीत दुसर्या फेरीत प्रवेश केला, तर पुरुष गटात रोहन बोपन्ना याने पाकिस्तानच्या ऐसाम उल हक कुरेशीसह खेळताना फ्रान्तीसेक सरमाक आणि मिखेल एलगिन जोडीचा ७-६, ७-६, ६-३ असा पराभव करीत पुढची फेरी गाठली़