शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

भारत रियोचे स्वप्न साकारण्यासाठी इटलीविरुद्ध खेळणार

By admin | Updated: July 2, 2015 03:07 IST

अव्वल मानांकित नेदरलँडकडून ०-७ फरकाने पराभव पत्करलेल्या भारतीय महिला हॉकी संघाचे रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचे स्वप्न अजूनही भंगलेले नसून उद्या

एंटवर्प : अव्वल मानांकित नेदरलँडकडून ०-७ फरकाने पराभव पत्करलेल्या भारतीय महिला हॉकी संघाचे रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचे स्वप्न अजूनही भंगलेले नसून उद्या हॉकी विश्व लीगच्या सेमीफायनलमध्ये इटलीवर मोठ्या अंतराने विजय नोंदवून आपल्या आशा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतील. रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी भारताला पाचव्या ते आठव्या स्थानासाठी इटलीविरुद्ध होणाऱ्या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. इटलीने आॅस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत आपल्या क्षमतेचा नमुना दाखवला होता. (वृत्तसंस्था)उपांत्य फेरीत स्थान मिळवणाऱ्या सर्वच संघांना आॅलिम्पिक क्वॉलिफिकेशनची संधी मिळू शकते आणि अशा स्थितीत भारत प्लेआॅफमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी कटिबद्ध असेल.भारतीय संघ वेगाने प्रगती करणाऱ्या इटलीविरुद्ध आपला बचाव सुधारण्याचा प्रयत्न करील. भारत जागतिक रँकिंगमध्ये १३ व्या आणि इटली १६ व्या स्थानी आहे. इटलीसाठी वर्ल्डकपमधील रौप्यपदक विजेत्या आॅस्ट्रेलियाविरुद्धची कामगिरी प्रेरणादायी ठरू शकेल. या सामन्यात पूर्वार्ध आणि उत्तरार्धात मिळवलेल्या प्रत्येकी एका पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करून हा सामना आॅस्ट्रेलियाने जिंकला होता. तसे पाहता इटली हा दुबळा प्रतिस्पर्धी नाही. याआधी डिसेंबरमध्ये झालेल्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत इटलीने २ सामने जिंकले होते, तर भारत फक्त एकच सामना जिंकू शकला होता आणि एक सामना ड्रॉ झाला होता.