शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

भारत ‘अ’ विजयाचे खाते उघडणार?

By admin | Updated: August 9, 2015 00:55 IST

भारत ‘अ’ खेळाच्या सर्व विभागांतील आपल्या दुबळेपणावर मात करताना दक्षिण आफ्रिक ा ‘अ’विरुद्ध तिरंगी एकदिवसीय क्रिकेट मालिकेत उद्या विजयाचे खाते उघडण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

तिरंगी वनडे मालिका : आफ्रिकेविरुद्ध आज लढत

चेन्नई : भारत ‘अ’ खेळाच्या सर्व विभागांतील आपल्या दुबळेपणावर मात करताना दक्षिण आफ्रिक ा ‘अ’विरुद्ध तिरंगी एकदिवसीय क्रिकेट मालिकेत उद्या विजयाचे खाते उघडण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.भारत ‘अ’ संघाला काल मालिकेतील पहिल्या सामन्यात आॅस्ट्रेलिया ‘अ’ने ११९ धावांनी पराभूत केले होते. या पराभवानंतरही प्रशिक्षक राहुल द्रविड यांना चांगल्या कामगिरीची आशा आहे. तथापि, संघाने त्यांनी आखलेल्या व्यूहरचनेची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.भारताचे मध्यमगती गोलंदाज धवल कुलकर्णी व संदीप शर्मा यांनी सुरुवातीला आॅस्ट्रेलियन सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि जो बर्न्स यांना फटकेबाजी करण्यास जास्त वाव मिळू दिला नाही. सराव सत्रादरम्यान द्रविडने बराच वेळ गोलंदाजांसोबत व्यतीत केला आणि गोलंदाजांना योग्य टप्प्यावर चेंडू टाकण्याचा आग्रह केला. खेळपट्टी संथ असल्यामुळे फलंदाजांना चेंडूंची प्रतीक्षा करून खेळण्याचा सल्ला दिला. आॅस्ट्रेलिया ‘अ’ विरुद्ध केदार जाधव व कर्णधार उन्मुक्त चंद यांनी ५० पेक्षा जास्त धावा केल्या; परंतु मयंक अग्रवाल, मनीष तिवारी आणि करुण नायर अपयशी ठरले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांना कामगिरी उंचवावी लागेल.रिजा हेंडरिक्स, डीन एगर, टी ब्रुईन आणि कोडी चेट्टी यांच्यामुळे दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाची फलंदाजीची फळी मजबूत दिसत आहे. गोलंदाजीत त्यांच्याकडे लोंवाबो सोटसोबे, हार्डूस व्ही., बुरान हेंडरिक्स, वेन पर्नेल, एडी ली, एगर यासारखे चांगले गोलंदाज आहेत. (वृत्तसंस्था)