शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

चौथ्या कसोटीत भारताला फारशी अडचण येणार नाही

By admin | Updated: March 24, 2017 23:41 IST

भारतीय संघ सध्या चांगली कामगिरी करीत आहे. आपली फलंदाजीही चांगली होत आहे. त्यामुळे, धरमशाळा येथे होणारा चौथा आणि अंतिम कसोटी

रोहित नाईक / मुंबईभारतीय संघ सध्या चांगली कामगिरी करीत आहे. आपली फलंदाजीही चांगली होत आहे. त्यामुळे, धरमशाळा येथे होणारा चौथा आणि अंतिम कसोटी सामना जिंकण्यात भारताला फारशी अडचण येणार नाही असे मला वाटते,’ असा विश्वास भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला.मुंबईत शुक्रवारी दिव्यांग खेळाडूंच्या आंतर विभागीय टी२० क्रिकेट स्पर्धेची घोषणा झाली. यावेळी वाडेकर यांनी आपले मत मांडले. संघाच्या कामगिरीबाबत त्यांनी सांगितले की, ‘भारताकडे सध्या खरंच खूप चांगली फलंदाजी आहे. कर्णधार विराट कोहली आणि इतर फलंदाज चांगली कामगिरी करीत असून संघाला बळकटी आणत आहेत. त्यामुळे, धरमशाला येथे होणाऱ्या आॅस्टे्रलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताला खूप काही अडचणी येतील असे दिसत नाही. आपण नक्की विजयी होऊ.’या कसोटी सामन्यासाठी सर्वांचे लक्ष कर्णधार कोहलीकडे लागले आहे. खांदा दुखावल्याने त्याच्या खेळण्यावर शंका निर्माण झाल्याने असे झाल्यास संघाची धुरा अजिंक्य रहाणे सांभाळेल. कर्णधारपद रहाणेकडे आल्यास सचिन तेंडुलकरनंतरचा तो पहिलाच मुंबईकर कर्णधार ठरेल. याबाबत वाडेकर म्हणाले की, ‘कोहली वयाने फार मोठा नाही. त्याच्याकडे बरेच क्रिकेट शिल्लक आहे. अजिंक्य आणि विराट दोघेही चांगले मित्र आहेत. ते एकमेकांना कायम सांभाळून घेतात. फलंदाजी करताना हे दिसून येते. मला वाटते की, जोपर्यंत विराटकडे कर्णधारपद आहे तोपर्यंत अजिंक्यने घाई न करता थांबलेले चांगले, पण मुंबईकर असल्याने अजिंक्यकडेही जन्मजात नेतृत्वाचे गुण आहेत, असे मला वाटते. जर खरंच विराट चौथ्या सामन्यात खेळला नाही, तर अजिंक्य नक्कीच सहजपणे भारताचे नेतृत्व सांभाळेल यात शंका नाही.’