शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

भारत न्यूझीलंडला कडवी झुंज देणार

By admin | Updated: June 23, 2015 01:35 IST

बेल्जियमविरुद्ध पहिल्या सामन्यात आक्रमक पवित्रा न अवलंबल्यामुळे १-0 ने पराभव पत्कराव्या लागणाऱ्या भारतीय महिला संघाला त्याच्या

एंटवर्प : बेल्जियमविरुद्ध पहिल्या सामन्यात आक्रमक पवित्रा न अवलंबल्यामुळे १-0 ने पराभव पत्कराव्या लागणाऱ्या भारतीय महिला संघाला त्याच्या व्यूहरचनेत बदल करून हॉकी विश्व लीग सेमीफायनलमध्ये उद्या न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या सामन्यात विजय मिळविण्याच्या वज्रनिर्धाराने मैदानात पाऊल ठेवावे लागेल.न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात पोलंडचा १२-0 असा धुव्वा उडवला होता, तर भारताला निसटता पराभव पत्करावा लागला होता. भारतीय संघ अखेरच्या दोन क्वॉर्टरमध्ये जास्त आक्रमकता दाखवू शकला नाही आणि त्याचे नुकसान त्यांना सोसावे लागले; परंतु खेळाडूंना पुढील सामन्यात मुसंडी मारण्याचा विश्वास आहे.भारतीय संघाची कर्णधार रितू राणी म्हणाली, ‘‘यजमान संघ बेल्जियमविरुद्ध पहिला सामना कठीण होता. न्यूझीलंड संघ चांगला असून, हा सामना आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. पहिल्या सामन्यातील निकाल आमच्यासाठी अनुकूल नसला, तरी आम्ही आशा गमावलेली नाही आणि उद्याच्या सामन्यात निश्चितच मुसंडी मारू.’’भारत आणि न्यूझीलंड संघ हाकबे कपमध्ये एकमेकांविरुद्ध लढले होते. त्यात भारतीय संघाला १-४ असा पराभवाचा सामना करावा लागला होता. ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध प्रत्येकी एक विजय मिळविला होता. भारतीय संघासाठी ही स्पर्धा रियो आॅलिम्पिकला क्वॉलिफाय करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे आणि त्यामुळे ते आपल्या कामगिरीत कोणतीही कसर सोडू इच्छित नाहीत.गेल्या सामन्यात भारतीय गोलरक्षक सविताने सुरेख खेळ केला होता; परंतु भारताला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करण्यासाठी खेळात सुधारणा करावी लागेल. मजबूत रक्षण आणि जबरदस्त पोझिशनिंगमुळे भारतीय संघ न्यूझीलंडला अडचणीत पकडू शकतो. भारत आणि न्यूझीलंड या महिला संघांदरम्यानचा हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी साडेपाच वाजता सुरू होईल. (वृत्तसंस्था)