शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू
2
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
3
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
4
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
5
Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले
6
FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश
7
Vastu Shastra: हिरव्या रंगाचे पायपुसणे दारात ठेवा, यश, कीर्ती, भाग्योदयाचा ग्रीन सिग्नल मिळवा!
8
Operation Sindoor : भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा रात्रीत खात्मा केला; पाकिस्तानमधील हल्ल्याचे फोटो आले समोर
9
“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य
10
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
11
ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन; 'श्यामची आई', '३ इडियट्स' सिनेमांमध्ये केलं होतं काम
12
Stock Market Today: आधी घसरण मग तेजी, Sensex १०० अंकांनी वधारला; ऑटो-बँकिंग स्टॉक्समध्ये मोठी खरेदी
13
“आगे बढ़ते रहो, ऐसाही बदला लेते रहो”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर शहीद नरवाल कुटुंबाने व्यक्त केला आनंद
14
"आम्ही मुस्लिमांना घर देत नाही", अली गोनी अन् जास्मीनला मुंबईत घर शोधताना आल्या अडचणी
15
आता तरी एकता दाखवा; काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकाऱ्याने एअर स्ट्राईकला म्हटले 'टुच्चेपणा'
16
Operation Sindoor: 'जय हिंद', राहुल गांधींची पाकिस्तानातील एअर स्ट्राईकनंतर पहिली पोस्ट; काय म्हणाले? 
17
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
18
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
19
Operation Sindoor : "जय हिंद की सेना...!", 'ऑपरेशन सिंदूर'वर रितेश देशमुखचं रात्री ३ वाजून २ मिनिटांनी ट्विट
20
Operation Sindoor : "अब मिट्टी में मिल जाओगे...", भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'चं देवोलिनानं केलं कौतुक

उज्बेकिस्तानवर भारताची २-० आघाडी

By admin | Updated: April 8, 2017 00:41 IST

रामकुमार रामनाथन व प्रग्नेश गुणेश्वरन यांनी आपापल्या एकेरीच्या लढतींमध्ये विजय मिळवत भारताला डेव्हीस कप आशिया-ओशियाना गटातील लढतीमध्ये उज्बेकिस्तानविरुद्ध २-० अशी आघाडी मिळवून दिली

बेंगळुरू : रामकुमार रामनाथन व प्रग्नेश गुणेश्वरन यांनी आपापल्या एकेरीच्या लढतींमध्ये विजय मिळवत भारताला डेव्हीस कप आशिया-ओशियाना गटातील लढतीमध्ये उज्बेकिस्तानविरुद्ध २-० अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या लढतीत २६७ वे मानांकन असलेल्या रामनाथनने तैमूर इसमाइललोव्हचा ६-२, ५-७, ६-२, ७-५ ने पराभव केला तर १८७ वे मानांकन असलेल्या गुणेश्वरनने संजार फेजियेबवर ७-५, ३-६, ६-३, ६-४ ने मात केली. इसमाइलोव्हच्या पायाचा स्नायू दुखावला होता, पण तरी त्याने रामकुमारविरुद्ध शानदार लढत दिली. रामकुमारला पहिला सेट जिंकण्यात कुठली अडचण आली नाही. दुसऱ्या सेटमध्येही रामकुमार ४-३ ने आघाडीवर होता, पण त्यानंतर इसमाइलोव्हने ०-४० च्या स्कोअरवर तीन ब्रेक पॉर्इंट दिले. रामकुमारने दोन ब्रेक पॉर्इंटचा बचाव केला, पण तिसऱ्या पॉर्इंटला बॅकहँड नेटमध्ये गेल्यामुळे त्याने सर्व्हिस गमावली. उज्बेकिस्तानच्या खेळाडूने त्यानंतर रामकुमारवर वर्चस्व गाजवित सेट जिंकला आणि १-१ अशी बरोबरी साधली. रामकुमारने १२ व्या गेममध्ये चार सेट पॉर्इंट गमावले आणि सर्व्हिसही गमावली. इसमाइलोव्हला तिसऱ्या सेटमध्ये पायाच्या दुखापतीला सामोरे जावे लागले. त्याचा रामकुमारला लाभ मिळाला. मेडिकल टाइम आऊटनंतर इसमाइलोव्हने दमदार पुनरागमन केले आणि चौथ्या सेटमध्ये आव्हान देण्यास सज्ज झाला. एकवेळ उभय खेळाडू ५-५ ने बरोबरीत होते. इसमाइलोव्हने त्यानंतर दोन सहज चुका केल्या. त्यामुळे रामकुमारला तीन ब्रेक पॉर्इंट मिळाले. रामकुमारने तिसऱ्या ब्रेक पॉर्इंटवर गुण वसूल केला. रामकुमारने त्यानंतर मॅच पॉर्इंटवर दोन दुहेरी चुका केल्या, पण फोरहँडच्या जोरकस फटक्यावर गुण वसूल करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. एकेरीच्या दुसऱ्या लढतीत गुणेश्वरनने पहिला, तिसरा व चौथा सेट जिंकला. दुसऱ्या सेटममध्ये गुणेश्वरन १-४ ने पिछाडीवर होता. उज्बेकिस्तानच्या खेळाडूने हा सेट जिंकत १-१ अशी बरोबरी साधली. तिसऱ्या सेटममध्ये गुणेश्वरनने अनेक चुका केल्यामुळे फेजियेव्हने ३-१ ने आघाडी घेतली होती. गुणेश्वरनने दमदार पुनरागमन करीत ४-३ अशी आघाडी घेतली. त्याने तिसरा सेट जिंकला व चौथ्या सेटमध्ये ६-४ बाजी मारत विजयावर शिक्कामोर्तब केले. या लढतीतील विजेता संघ विश्व ग्रुप प्ले आॅफसाठी पात्र ठरणार आहे.