शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

भारत चौथ्या स्थानी कायम

By admin | Updated: July 7, 2015 01:31 IST

भारताने आयसीसी कसोटी मानांकनामध्ये चौथे स्थान कायम राखले आहे.

कसोटी मानांकन : इंग्लंडला आगेकूच करण्याची संधीदुबई : भारताने आयसीसी कसोटी मानांकनामध्ये चौथे स्थान कायम राखले आहे; पण आशियाई संघाच्या तुलनेत एका गुणाने पिछाडीवर असलेल्या इंग्लंड संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी ॲशेस मालिकेदरम्यान आगेकूच करण्याची संधी आहे. बुधवारपासून कार्डीफमध्ये ॲशेज मालिकेला प्रारंभ होत आहे. या प्रतिष्ठेच्या मालिकेत उभय संघ विजयासह मानांकनामध्ये सुधारणा करण्यास प्रयत्नशील आहेत. इंग्लंड ९७ गुणांसह पाचव्या स्थानी आहे. दशांश गुणफरकाने इंग्लंड संघ पाकिस्तानच्या तुलनेत पुढे आहे. ऑस्ट्रेलिया संघ १११ मानांकन गुणांसह दुसर्‍या स्थानी आहे. इंग्लंडने या मालिकेत ३-०ने विजय मिळविला, तर त्यांना दुसर्‍या स्थानावर पोहोचण्याची संधी असेल; पण ऑस्ट्रेलियाने पाचही सामन्यांत विजय मिळविला, तर यजमान संघाची सातव्या स्थानी घसरण होईल. ऑस्ट्रेलियाने ५-०ने विजय मिळविला, तर त्यांचे ११८ मानांकन गुण होतील आणि अव्वल स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेपेक्षा ते १२ गुणांनी पिछाडीवर असतील. इंग्लंडने पाचही सामन्यांत विजय मिळविला, तर ऑस्ट्रेलियाची चौथ्या स्थानावर घसरण होईल. इंग्लंडने ३-० किंवा ४-१ ने विजय मिळविला, तर ऑस्ट्रेलिया संघाची आपल्या परंपरागत प्रतिस्पर्धी संघाच्या तुलनेत तिसर्‍या स्थानावर घसरण होईल. फलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार स्टीव्हन स्मिथ आपले अव्वल स्थान कायम राखण्याच्या निर्धाराने या मालिकेत सहभागी होईल. स्मिथने सध्या दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सपेक्षा पाच गुणांची आघाडी घेतली आहे. दरम्यान, विराट कोहली (१०व्या स्थानी) कसोटी फलंदाजांच्या मानांकनामध्ये अव्वल १० मध्ये समावेश असलेला एकमेव भारतीय आहे. गोलंदाजी क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन अव्वल स्थानी असून, भारताच्या एकाही गोलंदाजाचा अव्वल १०मध्ये समावेश नाही. (वृत्तसंस्था)०००