शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
6
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
7
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
8
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
9
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
10
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
11
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
12
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
13
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
14
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
15
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
16
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
17
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
18
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
19
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
20
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना

भारत-पाकिस्तान आज टशन

By admin | Updated: February 15, 2015 01:30 IST

जखमी खेळाडू आणि कामगिरीत सातत्याचा अभाव या समस्यांनी ग्रासलेल्या माजी विजेत्या टीम इंडियाला जेतेपद टिकविण्याच्या प्रयत्नात आज रविवारी पाकविरुद्ध पहिली परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे.

अ‍ॅडिलेड : जखमी खेळाडू आणि कामगिरीत सातत्याचा अभाव या समस्यांनी ग्रासलेल्या माजी विजेत्या टीम इंडियाला जेतेपद टिकविण्याच्या प्रयत्नात आज रविवारी पाकविरुद्ध पहिली परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. पारंपरिक हाडवैरी राहिलेल्या उभय देशांमधील या लढतीला गर्दी उसळणार हे नक्की. तब्बल २० हजार भारतीय सामन्याचा थरार अनुभवण्यासाठी अ‍ॅडिलेडला दाखल झाले हे विशेष.सिडनीत १९९२ साली भारत-पाकमध्ये विश्वचषकात पहिली लढत झाली. तेव्हापासूनच्या पाचही लढती भारताने जिंकल्यामुळे इतिहासापासून प्रेरणा घेण्याचा प्रयत्न राहील. दुसरीकडे पाकचे देखील विजयी सुरुवात करण्याचे मनसुबे असल्यामुळे ‘सुपर संडे’ ही लढत लक्षवेधी ठरेल. सराव सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजीत फारसा प्रभाव न पाडणाऱ्या भारतीय खेळाडूंना फिटनेसचीही मुख्य चिंता आहे. भारताला सचिन, अजय जडेजा किंवा व्यंकटेश प्रसाद यांनी आधी सूत्रधार या नात्याने विजय मिळवून दिले. सध्याच्या संघाला विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या बळावर विजय मिळविण्याची आशा आहे. धोनीचा आकड्यांवर कधीही विश्वास नसतो, पण आधीचा ५-० चा रेकॉर्ड हा कर्णधाराला सकारात्मक ऊर्जा प्रदान करू शकणार आहे. मिस्बाह उल हकच्या नेतृत्वाखालील पाक संघ फॉर्ममध्ये नसल्याचा लाभही भारताला मिळू शकतो. मोहम्मद हाफिज हा फलंदाज आणि स्विंग मारा करणारा जुनैद खान हे संघाबाहेर आहेत शिवाय सईद अजमलला देखील संघाने गमावले. न्यूझीलंडकडून अलीकडे झालेला ०-२ असा पराभवदेखील पाकसाठी निराशादायी ठरला. तरीही पाक संघात कुणालाही खडे चारण्याची क्षमता आहे. या संघाने सराव सामन्यात बांगला देश आणि इंग्लंडला नमविले होते. इंग्लंडविरुद्ध मिस्बाहने ९१ धावा देखील ठोकल्या. भारताला आॅस्ट्रेलियाकडून दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर दुसऱ्या सामन्यात अफगाण संघावर विजय मिळविण्यात यश आले. विश्वचषकात सलग पाच पराभव पत्करल्याने पाकवर निश्चितपणे दबाव असणार.अफगाण संघाविरुद्ध रोहित शर्माने १५० धावा ठोकल्या. तो पहिल्या विश्वचषकात धावांचा भुकेला असेल तर अजिंक्य रहाणे सातत्याने धावा काढत आहे. तिरंगी मालिकेनंतर सराव सामन्यात कोहली फ्लॉप ठरल्याने मात्र संघाची चिंता वाढली. विश्वचषकाच्या सामन्यात महत्त्वाचे फलंदाज फॉर्ममध्ये यावेत अशी धोनीची अपेक्षा असावी. गेल्या अडीच महिन्यांत सपशेल ढेपाळलेली गोलंदाजी ही आणखी एक डोकेदुखी. ईशांत शर्मा बाहेर आहे, तर भुवनेश्वरकुमार देखील फॉर्ममध्ये नाही. अशावेळी मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांच्यावर भिस्त राहील. या दोन्ही गोलंदाजांमध्ये शिस्तबद्ध मारा करण्याची क्षमता कमी आहे. स्टुअर्ट बिन्नी हा मोठ्या संघाविरुद्ध विजयात योगदान देण्यात आतापर्यंत तरी यशस्वी झालेला नाही. फिरकी माऱ्यासाठी रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांची क्षमता सारखीच आहे. जडेजा हा फलंदाजीतही योगदान देऊ शकतो, ही बाब वेगळी. पाक संघात मिस्बाह, यूनिस आणि आफ्रिदी हे अनुभवी त्रिकूट आहे. याशिवाय प्रतिभावान उमर अकमल, आणि फॉर्ममध्ये असलेला शोएब मकसूद हे देखील प्रभावी ठरू शकतात. गोलंदाजीत वहाब रियाज आणि सात फूट उंची लाभलेला मोहम्मद इरफान यांचा मारा निर्णायक ठरेल. (वृत्तसंस्था)संघ यातून निवडणारभारत : महेंद्रसिंग धोनी कर्णधार, शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, अंबाती रायुडू, सुरेश रैना, स्टुअर्ट बिन्नी, भुवनेश्वरकुमार, उमेश यादव, मोहित शर्मा, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी.पाकिस्तान : मिस्बाह उल हक कर्णधार, शहीद आफ्रिदी, अहमद शहजाद, नासिर जमशेद, हॅरिस सोहेल, शोएब मक्सूद, अहसान आदील, युनिस खान, उमर अकमल, मोहम्मद इरफान, वहाब रियाज, यासिर शाह, सोहेल खान, सर्फराज अहमद आणि राहत अली.आम्ही पाकविरुद्धच्या महत्त्वाच्या लढतीत दबावाचा सामना करण्यास सक्षम असल्याचे म्हटले आहे़ यापूर्वीही पाकविरुद्ध सर्वोत्कृष्ट खेळ करून आम्ही स्वत:ला सिद्ध केले आहे़ यावेळी या संघाविरुद्ध विश्वचषकपमधील विजयी अभियान कायम राखू, असा विश्वासही त्याने व्यक्त केला आहे़ आम्हाला ४० जे ५० हजार प्रेक्षकांसमोर सामना खेळण्याची सवय आहे़ त्यामुळे आमच्यावर कोणताही दबाव नसेल़ उलट पाकिस्तानवर दबाव राहणार आहे़ कारण यापूर्वी वर्ल्डकपमध्ये झालेल्या सर्व सामान्यांमध्ये आम्ही त्यांना धूळ चारली आहे़ इतिहास आमच्या बाजूने असला तरी भूतकाळाला जास्त महत्त्व देत नाही़ आमच्या खेळाडूंची तयारी उत्कृष्ट आहे़ याच बळावर आम्ही पाकवर सरशी साधू.- महेंद्रसिंग धोनीकर्णधार, भारतप्लेयर्सभारताच्या या मध्यमफळीतील स्टार फलंदाजावर भारतीय संघाची संपूर्ण मदार असणार आहे. कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याची व एकहाती सामना फिरवण्याची क्षमता त्याच्यात आहे. बांगलादेशमध्ये झालेल्या आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराटने सर्वोच्च कामगिरी करत १८३ धावांची खेळी केली होती. विराटला सध्याच्या परिपूर्ण एकदिवसीय फलंदाज म्हणून ओळखले जाते. भारतीय संघाचा हा संकटमोचक खेळाडू ‘चेस’ करण्यात माहिर आहे. पाकला त्याच्यापासून सावध रहावे लागेल.सामने : १४८धावा : ६,९११सरासरी : ५१.८४एकदिवसीय सामन्यातील सर्वांत स्फोटक खेळाडू म्हणून शाहिद आफ्रिदीची ओळख आहे. सर्वाधिक षट्कार खेचण्याचा विक्रम नावावर असणारा हा खेळाडू विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानच्या भारताविरुद्धच्या कामगिरीचा इतिहास बदलू इच्छित आहे. गोलंदाजीची विशिष्ट शैली असणारा आफ्रिदी भल्या भल्या फलंदाजांना अडचणीत आणतो. त्याला लवकरात लवकर बाद करुन खेळपट्टीवर स्थिरावू न देणे हे भारताच्या हिताचे आहे.पाच विजयांचा देदीप्यमान इतिहासमोहालीचे स्टेडियम खचाखच भरले होते... भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह राजकीय वर्तुळातील अनेक मान्यवर तसेच पाकिस्तानमधून अनेक राजकीय व्यक्तींची उपस्थिती भारत-पाकिस्तान यांच्यातील उपांत्यफेरीच्या लढतीला लाभली होती. या हाय व्होल्टेज सामन्यात इतिहासाचा दाखला देत भारत बाजी मारणार हे निश्चित मानले जात होते. झालेही तसेच; परंतु पाकिस्तानच्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे ही लढत भारताच्या पारड्यात पडली. सचिन तेंडुलकरला जवळपास पाच जीवदान देऊन पाकने स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला. सचिनने ११५ चेंडूंत ८५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करून संघाला ९ बाद २६० धावांची मजल मारून दिली. वहाब रियाजने ४६ धावांत भारताचा निम्मा संघ तंबूत धाडला. सुरेश रैनाने मधली फळी सांभाळून ३९ चेंडूंत नाबाद ३६ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकने चांगली सुरुवात केली खरी; परंतु त्यांना सातत्य राखण्यात अपयश आले. कर्णधार मिसबाह उल हकने ७६ चेंडूंत ५६ धावा करून एकाकी झुंज दिली. मात्र, त्याच्या संथ खेळीमुळे त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका झाली. पाकला हा सामना २९ धावांनी गमवावा लागला. झहीर खान, आशिष नेहरा, मुनाफ पटेल, हरभजन सिंग आणि युवराज सिंग यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.विश्वचषकमध्ये पाकिस्तानला भारताविरुद्ध आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही; मात्र यावेळी जर या संघाविरुद्ध पराभव टाळायचा असेल, तर खेळाडंूनी आपल्या भावनेवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. भूतकाळात काय झाले याला जास्त महत्त्व न देता खेळाडूंनी प्रत्यक्ष मैदानावर आपले शंभर टक्के योगदान देणे गरजेचे आहे़ प्रत्येक खेळाडूने सकारात्मक खेळ केला, तर या लढतीत विजयापासून आम्हाला कुणीही रोखू शकत नाही़ - मिस्बाह उल हककर्णधार, पाकिस्तान