शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
2
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
3
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
4
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
5
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
6
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
7
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
8
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
9
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
10
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
11
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
12
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
13
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
14
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
15
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
16
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
17
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
18
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
19
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
20
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले

चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत केवळ कोहलीवर विसंबून नाही : कपिल

By admin | Updated: May 11, 2017 20:32 IST

विराट कोहलीचा फॉर्म हा चिंतेचा विषय ठरू नये. चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान संघाचे यश केवळ त्याच्यावरच विसंबून नसल्यामुळे ही बाब निरर्थक ठरत

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 11 : विराट कोहलीचा फॉर्म हा चिंतेचा विषय ठरू नये. चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान संघाचे यश केवळ त्याच्यावरच विसंबून नसल्यामुळे ही बाब निरर्थक ठरत असल्याचे मत विश्वविजेता संघाचा माजी कर्णधार कपिल देव यांनीव्यक्त केले. चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात जूनच्या पहहिल्या आठवड्यात इंग्लंडमध्ये होत असून, सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये कोहली चक्क फ्लॉप ठरला आहे. कोहलीच्या फॉर्ममुळे चॅॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान भारताच्या कामगिरीवरविपरीत परिणाम होईल का, असा सवाल करताच कपिल म्हणाले,ह्यआपण धर्मशालामधील आॅस्ट्रेलियाविरुद्धचा कसोटी सामना पाहिला का? कोहली खेळणार नसेल तर भारत पराभूत होईल, अशी भीती प्रत्येकाने व्यक्त केली होती. पण काय घडले, हेसर्वांना ठाऊक आहे. भारताचे भवितव्य केवळ कोहलीवर विसंबून आहे असे म्हणण्याचा अर्थ संघातील अन्य खेळाडूंचा आत्मविश्वास कमी करणे असा होतो.५८ वर्षांचे कपिल पुढे म्हणाले, कोहली संघाचा मोलाचा सदस्य आहे. दिग्गज फलंदाजदेखील आहे. कधी कसे खेळायचे याची त्याला चांगली जाणीव आहे. भारत ही स्पर्धा जिंकू शकतो; पण स्पर्धेदरम्यान डावपेच कसे कार्यान्वित होतात, यावर विजयाचे समीकरण ठरणार आहे. दिल्लीचा मॅडम तुसाद संग्रहालयात कपिल यांच्या मेणाच्या पुतळ्याचे त्यांच्याच हस्ते आज अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना कपिल म्हणाले, भारताने गेल्या पाच वर्षांत खेळाचा दर्जा उंचावला आहे. संघबांधणी चांगलीच झाली आहे. सामन्याच्या दिवशीच्या कामगिरीवर आणि प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणण्याच्या वृत्तीवर संघाची वाटचाल अवलंबूनराहील. एखादा विशेष गोलंदाज विजयासाठी महत्त्वपूर्ण ठरेल का, असे विचारताच ते म्हणाले,ह्यएखादा नव्हे तर सर्वच गोलंदाजांची सांघिक भूमिका संघाच्या यशासाठी कारणीभूत ठरेल. आमच्या तुलनेत आजच्या युवा गोलंदाजांमध्ये अधिकजोश आहे. आम्ही परिपक्व होतो तर आजचे गोलंदाज अधिक व्यावसायिक बनले आहेत. निवडकर्त्यांनी युवा खेळाडूंच्या तुलनेत संघ निवडताना अनुुभवाला अधिक प्राधान्य दिले आहे. संघ निवडीबद्दल कपिल म्हणाले, निवडकर्त्यांवर टीका करणे योग्य नाही. युवा खेळाडूंना झुकते माप दिले असते तर अनुभवी खेळाडूंकडे डोळेझाक झाली, अशी टीका झाली असती. निवडकर्त्यांनी चांगला संघ निवडला, असे माझे मत आहे. भारताकडे अद्यापही कपिलसारखा अष्टपैलू गोलंदाज नाही. दुसरा कपिल कधी घडू शकतो, असे विचारताच ते म्हणाले, हे कठीण काम आहे. माझ्या तुलनेत सरस खेळाडू यावेत, असे मलादेखील वाटते. अश्विन आणि जडेजासारखे चांगले युवाअष्टपैलू खेळाडूंची संघाला गरज आहे.