शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
3
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
4
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
5
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
6
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
7
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
8
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
9
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
10
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
11
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
12
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
13
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
14
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
15
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
16
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
17
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
18
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
19
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
20
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
Daily Top 2Weekly Top 5

भारताने कास्य गमावले

By admin | Updated: July 6, 2015 01:19 IST

इंग्लंडने रियो आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाच्या बचाव फळीतील उणिवा स्पष्ट करीत रविवारी खेळल्या गेलेल्या लढतीत ५-१ ने शानदार विजय मिळवला.

एंटवर्प : इंग्लंडने रियो आॅलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाच्या बचाव फळीतील उणिवा स्पष्ट करीत रविवारी खेळल्या गेलेल्या लढतीत ५-१ ने शानदार विजय मिळवला आणि एफआयएच हॉकी वर्ल्ड लीग सेमीफायनल्समध्ये कास्यपदकाचा मान मिळवला. भारताचा बचाव सलग दुसऱ्या लढतीतही ढेपाळला. इंग्लंडने पहिल्या क्वॉर्टरमध्ये आघाडी मिळविल्यानंतर तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये भारतीय बचावला एकापाठोपाठ एक हादरे दिले. एलेस्टेयर ब्रागडनने ११ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवत इंग्लंडचे खाते उघडले. अ‍ॅशले जॅक्सनने ३७ व्या मिनिटाला मैदानी गोल नोंदवत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. अ‍ॅडम डिक्सनने ४२ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर इंग्लंडतर्फे तिसरा गोल नोंदवला. बॅरी मिडल्टनने ४४ व ४५ व्या मिनिटाला सलग दोन गोल नोंदवत इंग्लंडला ५-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. भारतातर्फे एकमेव गोल सामन्याच्या अखेरच्या मिनिटाला रूपदिंरपाल सिंगने पेनल्टी कॉर्नरवर नोंदवला. भारतीय गोलकीपर पी. आर. श्रीजेशने चांगला बचाव केला; पण त्याला योग्य साथ लाभली नाही. या लाजिरवाण्या पराभवासह भारताची या स्पर्धेतील मोहीम संपली. याआधी, फ्रान्सने पाकिस्तानचा २-१ ने पराभव करीत सातवे स्थान पटकावले, तर आयर्लंडने मलेशियाविरुद्ध ४-१ ने विजय मिळवत पाचवे स्थान पटकावले. (वृत्तसंस्था)