शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

भारत ‘अ’ ११९ धावांनी पराभूत

By admin | Updated: August 7, 2015 22:33 IST

जो बर्न्स आणि कर्णधार उस्मान ख्वाजा या सलामी जोडीने द्विशतकी भागीदारी केल्यामुळे आॅस्ट्रेलिया अ संघाने शुक्रवारी भारतीय अ संघाचा वन डे तिरंगी मालिकेत ११९ धावांनी पराभव केला

चेन्नई : जो बर्न्स आणि कर्णधार उस्मान ख्वाजा या सलामी जोडीने द्विशतकी भागीदारी केल्यामुळे आॅस्ट्रेलिया अ संघाने शुक्रवारी भारतीय अ संघाचा वन डे तिरंगी मालिकेत ११९ धावांनी पराभव केला. बर्न्सने फटकेबाजीचा शानदार नमुना सादर करीत १४ षटकारांसह १५४ धावा ठोकल्या. २५ वर्षांच्या या फलंदाजाने १३१ चेंडू टोलविले. कारकिर्दीत ही त्याची सर्वोच्च खेळी ठरली. ख्वाजाने देखील १०४ धावांचे योगदान देत सलामीला २३९ धावांची भागीदारी करताच आॅस्ट्रेलिया अ ने ५० षटकांत ४ बाद ३३४ धावा उभारल्या. मोठ्या लक्ष्यापुढे सुरुवातीपासून दडपणात वावरणाऱ्या भारत अ चा डाव ४२.३ षटकांत २१५ धावांत आटोपला. कर्णधार उन्मुक्त चंद ५२, केदार जाधव ५० यांनी अर्धशतकी खेळी केल्यामुळे पराभवाचे अंतर काही अंशी कमी होऊ शकले. आॅस्ट्रेलियाकडून मध्यम जलद गोलंदाज गुरिंदरसिंग संधू याने २८ धावांत चार आणि लेगस्पिनर अ‍ॅडम जांपा याने ४९ धावा देत चार गडी बाद केले. आॅस्ट्रेलियाचा स्पर्धेत हा सलग दुसरा विजय आहे. पहिल्या सामन्यात त्यांनी द. आफ्रिका अ संघाचा नऊ गड्यांनी पराभव केला होता. भारत अ वर विजय मिळविल्यानंतर त्यांचे दहा गुण झाले. भारत अ आणि द. आफ्रिका अ हा सामना ९ आॅगस्ट रोजी खेळला जाईल. भारतीय अ संघाचे आघाडीचे फलंदाज स्थिरावून खेळण्यात अपयशी ठरले. मयंक अग्रवाल १०, मनीष पांडे ११ आणि करुण नायर ६ हे बाद होताच ३ बाद ६७ धावा झाल्या. उन्मुक्तने एक टोक सांभाळले. पण अर्धशतक होताच त्याचीही दांडी गूल झाली. झिम्बाब्वेविरुद्ध शतक झळकविणाऱ्या केदार जाधवकडून आशा होत्या पण तो मोठी भागीदारी करण्यात अपयशी ठरताच भारताच्या आशा मावळल्या. संजू सॅमसन ११ आणि अक्षर पटेल १६ यांच्यापाठोपाठ जाधव देखील अर्धशतकानंतर झेलबाद झाला. परवेझ रसूल १० आणि कर्ण शर्मा २० तसेच धवल कुलकर्णी १९ यांनी दुहेरी आकडा गाठला पण संघाचा पराभव टाळू शकले नाहीत. त्याआधी बर्न्स आणि ख्वाजा यांनी भारतीय मारा मनसोक्त फोडून काढला. दोघांनीही मिळालेल्या जीवदानाचा लाभ उचलला. भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या काही षटकांत सामन्यात परतण्याचे प्रयत्न केले. (वृत्तसंस्था)