ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीच्या सेमिफायनलच्या सामन्यात अटितटीच्या लढतीत पाकिस्तान संघाने भारताचा ४-३ असा पराभव केला. पाकिस्तानचा संघ या विजयाबरोबरच फायनलमध्ये पोहोचला असून पाकिस्तान संघाची लढत आता जर्मनीबरोबर होईल.
भारत-पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात शेवटपर्यंत भारताने आपल्या अशा जिवंत ठेवल्या होत्या. पाकिस्तानने २-१ अशी आघाडी घेतल्यावर भारताने लगेच गोल करीत बरोबरी साधली. त्यानंतर २-२,३-३, अशी बरोबरी साधून भारताने पाकिस्तानला चोख प्रत्यूत्तर दिले मात्र शेवटच्या काही मिनिटात पाकिस्तानच्या कादीरने चौथा गोल करीत संघाला ४-३ असा विजय मिळवून दिला. अंतिम सामन्यात पाकिस्तानची लढत आता जर्मनीबरोबर पाहायला मिळणार आहे.