शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

भारत-कोरिया डेव्हिस चषक लढत आजपासून

By admin | Updated: July 14, 2016 18:55 IST

एकेरीतील खेळाडूंच्या जखमा तसेच रिओ आॅलिम्पिकला जाणाऱ्या दुहेरीच्या जोडीदरम्यान असलेल्या मतभेदाच्या पार्श्वभूमीवर भारताची आशिया ओसियाना डेव्हिस चषक टेनिस लढतीत

चंदीगड : एकेरीतील खेळाडूंच्या जखमा तसेच रिओ आॅलिम्पिकला जाणाऱ्या दुहेरीच्या जोडीदरम्यान असलेल्या मतभेदाच्या पार्श्वभूमीवर भारताची आशिया ओसियाना डेव्हिस चषक टेनिस लढतीत आज शुक्रवारपासून कोरियाविरुद्ध गाठ पडतआहे. ही लढत भारत जिंकेल, असा दावा करण्यात येत आहे. युकी भांबरी आणि सोमदेव देवबर्मन जखमी असल्याने २१ वर्षांचा रामकुमार रामनाथन पहिल्यांदा डेव्हिस चषकात खेळेल.फोरहॅन्डचे फटके मारण्यात पटाईत असलेल्या रामनाथनसाठी ही मोठी संधी असेल. कोरिया संघातही सर्वोत्कृष्ट असलेल्या सियोनग चान याचा समावेश आहे. याशिवाय एटीपी एकेरीत रँकिंग पटकविलेले युनसियोंग चूंग आणि होंग चूंग हे संघात आहेत. दुसरीकडे भारतीय संघात अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. भारताने या लढतीसाठी ग्रासकोर्टला प्राधान्य दिले. कोरिया संघातील खेळाडूंमध्ये बेबनाव आहे. दोन्ही कोरियाचे पारंपरिक मतभेद खेळाडूंमध्ये समन्वय घडविण्यातील मोठा अडथळा आहेत. भारतीय संघातील दुहेरी जोडी बोपन्ना-पेस यांच्यात या लढतीच्या निमित्ताने समेट घडून येण्याची शक्यता आहे.त्यांच्या खेळात ताळमेळ निर्माण होणार असेल तर भारतीय संघाला याचा लाभ रिओ आॅलिम्पिकदरम्यान होऊ शकतो.२००८ साली ग्रासकोर्टवर भारताने जपानचा ३-२ ने निसटता पराभव केला होता.भारत कोरिया लढतीतील विजेत्या संघाला विश्व ग्रुप प्ले आॅफमध्ये स्थान मिळेल. तेथे चीन किंवा उझबेकिस्तान यांच्याविरुद्ध सामना खेळावा लागेल.चंदीगड क्लबच्या ग्रासकोर्टवर याआधी २०१२ च्या डेव्हिस चषक लढतीत भारताने न्यूझीलंडचे यजमानपद भूषविले होते.हरियाणा- पंजाबचे राज्यपाल कप्तानसिंग सोळंकी यांनी राजभवनात झालेल्या सोहळ्यात लढतीचा ड्रॉ काढला. यावेळी उभय संघातील खेळाडू, कर्णधार आणि अ.भा. टेनिस संघटनेचे अध्यक्ष अनिल खन्ना उपस्थित होते. (वृत्तसंस्था)