शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

भारत कसोटीत भक्कम स्थितीत, ऑस्ट्रेलियावर 152 धावांची आघाडी

By admin | Updated: March 19, 2017 17:33 IST

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधला रांचीमधल्या तिस-या कसोटी सामन्याचा चौथा दिवस रंगतदार ठरला आहे.

ऑनलाइन लोकमतरांची, दि. 19 - भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधला रांचीमधल्या तिस-या कसोटी सामन्याचा चौथा दिवस रंगतदार ठरला आहे. टीम इंडियानं आपला पहिला डाव 9 गड्यांच्या मोबदल्यात 603 धावांवर घोषित केला आहे. विशेष म्हणजे कसोटीत भारताकडे ऑस्ट्रेलियाविरोधात 152 धावांची आघाडी आहे. रवींद्र जाडेजानं डेव्हिड वॉर्नर आणि नॅथन लायनचा बाद करत चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाला 2 बाद 23 धावांवर रोखले आहे. भारताकडे अद्यापही 129 धावांची आघाडी आहे. त्यामुळेच कसोटीत टीम इंडियाला विजयाची आशा आहे. टीम इंडियाला रांची कसोटीत ख-या अर्थानं पुजारा आणि साहा यांनी सातव्या विकेटसाठी केलेल्या 199 धावांच्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियावर वर्चस्व प्रस्थापित करणं सहजशक्य झालं आहे. चेतेश्वर पुजारानं केलेलं द्विशतक, त्याचबरोबर रिद्धिमान साहाचं शतक आणि रवींद्र जाडेजाचं नाबाद अर्धशतक यांच्या जोरावर टीम इंडियानं रांची कसोटीत 9 बाद 603 या धावांपर्यंत मजल मारत पहिला डाव घोषित केला होता. त्यामुळे भारताला पहिल्या डावात 152 धावांची आघाडी मिळाली होती.पुजारानं 505 चेंडूंत 21 चौकारांसह 202 धावांची खेळी केली. रिद्धिमान साहानं आठ चौकार आणि एका षटकार लगावत 117 धावा करत भारताच्या धावसंख्येत भर घातली. त्यानंतर मैदानावर आलेल्या रवींद्र जाडेजानं पाच चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 54 धावा ठोकून टीम इंडियाला दिशा मिळवून दिली. पुजारा आणि साहा यांनी सातव्या विकेटसाठी रचलेल्या 199 धावांच्या भागीदारीनं टीम इंडिया भक्कम स्थितीत पोहोचली. रांची कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतानं ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. चेतेश्वर पुजारा आणि रिद्धिमान साहाच्या भक्कम भागीदारीच्या जोरावर टीम इंडियानं ऑस्ट्रेलियावर सहजरीत्या आघाडी मिळवली. मात्र रिद्धिमान साहाला पंचांनी बाद केले असतानाच उफर वापरल्यामुळे साहाला अखेर जीवदान मिळालं. यामुळे ऑस्ट्रेलियनं संघात कमालीची नाराजी पसरली होती.