शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

विजयासाठी भारत उत्सुक

By admin | Updated: June 17, 2017 02:52 IST

विश्व हॉकी लीग सेमीफायनल्समध्ये भारताने स्कॉटलंडवर विजय मिळवल्यानंतर शनिवारी भारताचा पुढचा सामना पुल बी मध्ये कॅनडासोबत होणार आहे.

लंडन : विश्व हॉकी लीग सेमीफायनल्समध्ये भारताने स्कॉटलंडवर विजय मिळवल्यानंतर शनिवारी भारताचा पुढचा सामना पुल बी मध्ये कॅनडासोबत होणार आहे. ही विजयी लय राखण्यास भारतीय संघ उत्सुक असेल. जगातील सहाव्या क्रमांकाचा संघ असलेल्या भारताकडे या विजयासह ग्रुपमध्ये चांगली स्थिती बनवण्याची संधी आहे. त्यानंतर भारताचा सामना पांरपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि नेदरलॅण्डसोबत होणार आहे. या सामन्यातदेखील भारताला विजयाचे दावेदार मानले जात आहे. कॅनडाच्या संघात काही खेळाडू भारतीय वंशाचे आहेत. रोलेंट आॅल्टमन्स यांच्या संघाला मात्र सावध रहावे लागले. कारण स्कॉटलंडने भारताविरोधात पहिल्याच क्वार्टरमध्ये आघाडी घेतली होती. पहिल्या दोन क्वार्टरमध्ये भारतीय संघाला अडचणींचा सामना करावा लागला होता. स्कॉटलंड विरोधात भारताने संथ सुरुवात केली होती. त्याचा फायदा घेत विरोधी संघाने मोठी आघाडी घेतली. उद्या होणाऱ्या सामन्यातील विजयानंतर भारताचा संघा उपांत्यपूर्व फेरीत नक्कीच पोहचू शकतो. भारतीय संघाला उद्याच्या सामन्यात त्यासाठी चांगला खेळ करावा लागेल. स्कॉटलंड विरोधातील सामन्यात बचाव फळीने चांगली सुरुवात केली नव्हती. स्पर्धेपूर्वीच भारताचा बचावफळीतील खेळाडू रुपिंदरपाल सिंह जखमी झाल्याने प्रशिक्षक रोलेंट ओल्टमन्स यांना त्याची कल्पना होती.रुपिंदरच्या अनुपस्थितीत कोथाजित सिंह अणि हरमनप्रीत सिंह यांना बचावाची जबाबदारी घ्यावी लागेल. मिडफिल्डची जबाबदारी सरदारा सिंह आणि कर्णधार मनप्रित सिंह यांच्याकडे आहे. हे दोन्ही सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. तर आघाडीच्या खेळाडूंनी पहिल्या सामन्यात चांगलेच प्रभावित केले. कॅनडाचा संघ या स्पर्धेतील आपला पहिला सामना खेळणार आहे. तसेच भारताविरोधात विजय मिळवण्यासाठी हे दोन्ही खेळाडू प्रयत्नशील असतील. (वृत्तसंस्था)