शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

भारत गुआमविरुद्ध २-१ ने पराभूत

By admin | Updated: June 17, 2015 02:01 IST

कर्णधार सुनील छेत्रीने ५० वा आंतरराष्ट्रीय गोल नोंदवला असला, तरी २०१८ च्या फिफा फुटबॉल विश्वकप प्री-क्वालिफायर

गुआम : कर्णधार सुनील छेत्रीने ५० वा आंतरराष्ट्रीय गोल नोंदवला असला, तरी २०१८ च्या फिफा फुटबॉल विश्वकप प्री-क्वालिफायर लढतीत भारतीय संघाला जागतिक क्रमवारीत १७४ व्या स्थानावर असलेल्या गुआम संघाविरुद्ध १-२ ने पराभव स्वीकारावा लागला. या निकालामुळे भारताच्या विश्वकप स्पर्धेसाठी पात्र ठरण्याच्या आशेला धक्का बसला आहे. येथील जीएफए राष्ट्रीय फुटबॉल स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या ‘ड’ गटाच्या लढतीत भारताने चांगली सुरुवात केली; पण ३६व्या मिनिटाला यजमान संघातर्फे ब्रॅन्डन मॅकडोनल्डने शानदार गोल नोंदवीत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. गेल्या आठवड्यात ओमानविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर मानांकनामध्ये १४१ व्या स्थानावर असलेल्या भारतीय संघासाठी हा सलग दुसरा पराभव आहे. यापूर्वी उभय संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या लढतीत भारताने ४-० ने विजय मिळवला होता. सामन्यात मध्यंतरापर्यंत स्कोअर १-० असा होता. भारत बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नशील होता; पण प्रतिस्पर्धी संघाच्या ट्रॅव्हिस निकलॉने ६२ व्या मिनिटाला गोल नोंदवीत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. शहनाज सिंगने खाते उघडण्याचा प्रयत्न केला; पण त्याला यश आले नाही. भारतीय कर्णधार छेत्रीने इंज्युरी टाइममध्ये संघातर्फे पहिला गोल नोंदविला. त्यानंतर गुआम संघाने आघाडी कायम राखत विजयावर शिक्कामोर्तब केले. छेत्रीचा हा ५० वा आंतरराष्ट्रीय गोल ठरला. त्याने या लढतीत वैयक्तिक विक्रम नोंदवला असला तरी संघाला मात्र त्याचा लाभ झाला नाही. भारत व तुर्कमेनिस्तान संघांविरुद्ध सलग दोन विजय मिळविणाऱ्या गुआम संघाने राऊंड-२ च्या ‘ड’ गटात गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली. गुआम संघाचा हा विश्वकप पात्रता स्पर्धेतील केवळ दुसरा विजय आहे. यापूर्वी त्यांनी ‘ड’ गटात तुर्कमेनिस्तानविरुद्ध १-० ने विजय मिळवला होता. (वृत्तसंस्था)५० गोल नोंदविणारा पहिला भारतीयतामुनिंग : भारतीय फुटबॉल संघाला विश्वकप पात्रता स्पर्धेत गट साखळी सामन्यात गुआमविरुद्ध १-२ ने पराभव स्वीकारावा लागला असला, तरी कर्णधार सुनील छेत्रीने आपल्या कारकिर्दीत ५० वा आंतरराष्ट्रीय गोल नोंदवण्याची कामगिरी केली.छेत्रीने आज सामना संपायला काही क्षणांचा अवधी शिल्लक असताना कारकिर्दीतील ५० वा गोल नोंदवला. भारतातर्फे ५० गोल नोंदवणारा तो पहिला खेळाडू ठरला. माजी कर्णधार बायचुंग भुतियाने १०७ सामन्यांत ४२ गोल नोंदवले असून, तो या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. तिसऱ्या स्थानावर असलेल्या आय. एम. विजयनने ७९ सामन्यांत ४० गोल नोंदवले आहेत. भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागल्यामुळे छेत्रीच्या या कामगिरीला विशेष महत्त्व देण्यात आलेले नाही. भारताचा या लढतीत विजय निश्चित मानला जात होता, पण संघाची कामगिरी निराशाजनक ठरली. खेळाडंूना फुटबॉलचे ज्ञान कमी-गुआमविरुद्धच्या लढतीत भारतीय खेळाडंूना फुटबॉलचे ज्ञान कमी असल्यासारखे जाणवले. त्यामुळे महत्त्वपूर्ण क्षणी संघाला व खेळाडूंना नुकसान झाले. खेळाडूंच्या आजच्या कामगिरीवर मी निराश झालो असल्याचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टेनटाईन यांनी म्हटले आहे.