शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

भारत जेतेपद कायम राखू शकतो

By admin | Updated: May 31, 2017 00:50 IST

गतचॅम्पियन भारतीय संघात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत जेतेपद कायम राखण्याची क्षमता आहे. भारतीय संघ समतोल असून वेगवान

लंडन : गतचॅम्पियन भारतीय संघात चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत जेतेपद कायम राखण्याची क्षमता आहे. भारतीय संघ समतोल असून वेगवान गोलंदाजी धारदार आहे, अशी प्रतिक्रिया श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने व्यक्त केली. संगकाराने स्तंभात म्हटले आहे, ‘यंदा या स्पर्धेत आशियातील चार संघ खेळत असून भारत या विभागात सर्वांत आघाडीवर आहे. भारताने २०१३ मध्ये जेतेपद पटकावले होते आणि यंदाही या संघात जेतेपद पटकावण्याची क्षमता आहे.’ संगकाराने म्हटले, ‘भारतीय संघ संतुलित व मजबूत  आहे. वेगवान गोलंदाजी धारदार  आहे. फिरकीपटू रविचंद्रन आश्विन  व रवींद्र जडेजा वन-डे क्रिकेटमध्ये शानदार आहेत. विराट कोहली आयपीएलमधील निराशाजनक कामगिरी पिछाडीवर सोडत या स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्यास उत्सुक असेल, असा मला विश्वास आहे.’ भारतीय संघातील फलंदाजांच्या निवडीबाबत बोलताना संगकारा म्हणाला, ‘भारताने फलंदाजांची निवड करताना परंपरागतपणा जपला  आहे, पण तरी त्यांची फलंदाजीची बाजू मजबूत आहे. भारतीय संघ उपांत्य फेरी गाठण्यासाठी प्रबळ दावेदारांपैकी एक आहे.’ संगकाराने सांगितले, ‘अंतिम फेरीसाठी संघांची निवड करणे  कठीण आहे, पण माझ्या मते उपांत्य फेरीसाठी प्रबळ दावेदार असलेल्या संघांमध्ये आॅस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे.’ २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०१४ मध्ये विश्व टी-२० स्पर्धेत जेतेपद पटकावणाऱ्या श्रीलंका संघात संगकाराचा समावेश होता. दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणाऱ्या संगकाराने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये एकूण २८,०१६ आंतरराष्ट्रीय धावा फटकावल्या आहेत. (वृत्तसंस्था)स्पर्धा चुरशीची होईल. चार-पाच संघ अंतिम फेरी गाठण्यास सक्षम आहेत. केवळ एक-दोन संघच वर्चस्व गाजवित असल्याचे दिवस आता संपले आहेत. अनेक देशांमध्ये क्रिकेटचा विकास झाला आहे. या सर्व संघांमध्ये प्रतिष्ठेच्या स्पर्धेत जेतेपद पटकावण्याची क्षमता आहे. इंग्लंडच्या वन-डे संघाने गेल्या दोन वर्षांत चांगली प्रगती केली आहे. इंग्लंड संघ आक्रमक खेळत असून या संघात काही विश्वदर्जाचे  खेळाडू आहेत.- कुमार संगकारा