शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा वेस्ट इंडिजवर २३७ धावांनी विजय

By admin | Updated: August 14, 2016 04:06 IST

तिस-या कसोटीत सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर २३७ धावांनी विजय मिळवला. तसेच, भारताने तिस-या कसोटीसह मालिकाही जिंकली. वेस्ट इंडिजचा दुसरा डाव २२५ धावांवर आटोपला.

ऑनलाइन लोकमतग्रोस इसलेट, दि. १४ - वेगवान गोलदांजांनी केलेल्या धडाकेबाज कामगिरीमुळे तिसऱ्या कसोटीच्या अखेरच्या दिवशी यजमान वेस्ट विंडीजला १०८ धावांत गुंडाळून भारताने २३७ धावांनी दणदणीत विजय मिळविला. या विजयासह ४ सामन्यांच्या मालिकेत पाहुण्या भारतीय संघाने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. 

भारताने दुसरा डाव ७ बाद २१७ धावांवर घोषित करून विंडीजसमोर विजयासाठी ३४६ धावांचे अवघड आव्हान ठेवले. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी खेळपट्टीचा पुरेपूर फायदा घेत दुसऱ्या डावातील पहिल्या षटकापासून विंडीजवर वर्चस्व गाजवले. मोहम्मद शमीने १५ धावांत ३ महत्त्वाचे फलंदाज बाद करून विंडीजचे कंबरडे मोडले. इशांत शर्माने ३० धावांत २ बळी घेतले. यात नाबाद शतक झळकावून विंडीजला दुसरी कसोटी अनिर्णीत राखून देणाऱ्या रोस्टॉन चेसचाही समावेश आहे. रवींद्र जाडेजाने २, तर भुवनेश्वर कुमार व आश्विन यांनी प्रत्येकी १ बळी घेत त्यांना चांगली साथ दिली.विंडीजतर्फे ब्राव्होने सर्वाधिक ५९ धावांचे योगदान दिले. विंडीजतर्फे केवळ ४ फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकले. पहिली कसोटी जिंकल्यानंतर दुसरी कसोटी अनिर्णीत राखून विंडीजने मालिकेत रंग भरला होता. अखेरची कसोटी पोर्ट आॅफ स्पेन येथे १८ तारखेपासून सुरू होणार आहे. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक भारत : पहिला डाव : सर्वबाद ३५३. दुसरा डाव ७ बाद २१७ (घोषित). वेस्ट इंडिज : पहिला डाव : सर्वबाद २२५. - दुसरा डाव : ४७.३ षटकांत सर्वबाद १०८ (के्रग ब्रेथवेट ४, लियोन जॉन्सन ०, सॅम्युअल्स १२, ब्राव्हो ५९, रोस्टन चेस १०, ब्लॅक वूड १, डाव्रिच ५, होल्डर १, जोसेफ ०, गॅब्रियल ११, शमी ३/११, इशांत २/३०, भुवनेश्वर १/१३, रवींद्र जाडेजा २/२०).