शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

भारताची इटलीवर मात

By admin | Updated: July 3, 2015 04:35 IST

भारताने हॉकी विश्व लीग सेमीफायनलच्या क्लासिफिकेशन लढतीत आज कमी रँकिंग असणाऱ्या इटली संघाला शूटआऊटमध्ये ५-४ असे पराभूत करताना आॅलिम्पिकमध्ये आपले स्थान

महिला हॉकी विश्व लीग : आॅलिम्पिकच्या आशा जिवंत

एंटवर्प : भारताने हॉकी विश्व लीग सेमीफायनलच्या क्लासिफिकेशन लढतीत आज कमी रँकिंग असणाऱ्या इटली संघाला शूटआऊटमध्ये ५-४ असे पराभूत करताना आॅलिम्पिकमध्ये आपले स्थान बनविण्यच्या आशा जिवंत ठेवल्या.जागतिक क्रमवारीत १३ व्या मानांकित भारतीय संघाने १६ व्या मानांकित इटलीला पाचव्या ते आठव्या स्थानासाठी झालेल्या लढतीत शूटआऊटमध्ये पराभूत केले. त्याआधी दोन्ही संघ निर्धारित ६0 मिनिटांच्या खेळामध्ये १-१ गोलने बरोबरीत होते.भारताने नियमित वेळेत गोल करण्याची अनेकदा मिळालेली संधी दवडली. एवढेच नव्हे तर शूटआऊटमध्येदेखील दोन्ही संघांनी पहिल्या पाच शॉटपैकी चारचे गोलमध्ये रूपांतर केले. त्यामुळे हा सामना सडनडेथपर्यंत खेचला गेला. त्यात राणी रामपॉलने सडनडेथमध्ये गोल करताना भारताला विजय मिळवून दिला. त्यानंतर गोलरक्षक सविताने जियुलियाना रुगिएरीचा फटका सुंदरपणे रोखताच भारतीय गोटात जल्लोष करण्यात आला.त्याआधी राणी रामपॉलने ३३ व्या मिनिटाला भारताकडून बरोबरीचा गोल केला. इटलीने नवव्या मिनिटाला गोल करीत आघाडी मिळविली होती.शूटआऊटमध्ये अनुभवी स्ट्रायकर वंदना कटारिया गोल करू शकली नाही; परंतु नवजोत कौर, अनुराधा थोकचोम, राणी रामपाल आणि दीपिका हे गोल करण्यात यशस्वी ठरले. इटलीकडून वेलेंटिना ब्राकोनी, मार्सेला कासेल, जियुलियाना रुगिएरी आणि चियारा टिड्डी यांनी गोल केले, तर डालिला मिराबेला हिचा भारतीय गोलरक्षक सविताने गोल करण्याचा प्रयत्न हाणून पाडला.भारताने इटलीविरुद्ध सुरुवातीलाच वर्चस्व राखले; परंतु ते गोल करण्यात अपयशी ठरले. भारताने तिसऱ्या आणि सहाव्या मिनिटाला गोल करण्याची सुवर्णसंधी गमावली. इटलीने नवव्या मिनिटाला प्रत्युत्तरात हल्ला केला आणि एलिजाबेथ बासेला रिबाऊंडवर गोल करण्यात यशस्वी ठरली.त्यानंतरही भारताने दबदबा निर्माण केला; परंतु गोल करण्यात पुन्हा अपयश आले. भारताने २९ व्या मिनिटाला मिळालेला पेनल्टी कॉर्नरदेखील गमावला. त्यामुळे इटली मध्यंतरास १-0 अशी आघाडीवर होती.भारताने उत्तरार्धात बरोबरीचा गोल केला. राणी रामपालने इटलीची कर्णधार टिड्डीकडून चेंडू आपल्या ताब्यात घेतला आणि एका अन्य डिफेंडर व गोलरक्षक मार्टिना चिरिकोला चकवताना शानदार बरोबरीचा गोल केला. (वृत्तसंस्था)