शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

ICC Champions Trophy 2017 - बांगलादेशचा न्यूझीलंडला "दे धक्का"

By admin | Updated: June 10, 2017 07:33 IST

शाकिब-अल-हसन (११४ धावा, ११५ चेंडू, ११ चौकार, १ षटकार ) व महमुदुल्ला (नाबाद १०२) यांनी वैयक्तिक शतके झळकावित

कार्डिफ : शाकिब-अल-हसन (११४ धावा, ११५ चेंडू, ११ चौकार, १ षटकार ) व महमुदुल्ला (नाबाद १०२) यांनी वैयक्तिक शतके झळकावित चौथ्या विकेटसाठी २२४ धावांच्या केलेल्या विक्रमी भागीदारीच्या जोरावर बांगलादेशने चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी न्यूझीलंडचा १६ चेंडू व ५ गडी राखून पराभव केला आणि उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा कायम राखल्या. बांगलादेशने न्यूझीलंडचा डाव ८ बाद २६५ धावांत रोखला आणि विजयसाठी आवश्यक धावा ४७.२ षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. या पराभवासह न्यूझीलंडचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. त्याआधी, आॅफ स्पिनर मोसद्देक हुसेन याने निर्णायक टप्प्यात पाठोपाठ तीन धक्के देत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अ गटातील अखेरच्या सामन्यात शुक्रवारी न्यूझीलंडला ५० षटकांत ८ बाद २६५ धावांपर्यंत मर्यादित ठेवले. २१ वर्षांचा अष्टपैलू मोसद्देकने १२ चेंडूत तीन गडी बाद करताच सामन्याचे चित्र पालटले. ४४ व्या षटकांत त्याने नील ब्रूम(३६) आणि कोरे अ‍ॅण्डरसन(००) यांना बाद केले. ४६ व्या षटकांत पुन्हा गोलंदाजीला आला तेव्हा जेम्स नीशामला(२३)त्याने पॅव्हेलियनची वाट दाखविली. तीन षटकांच्या गोलंदाजीत त्याने १३ धावांत तीन गडी बाद केले. बांगलादेशचा कर्णधार मुशर्रफ मूर्तझाने ४२ व्या षटकांत मोसद्देककडे चेंडू सोपविला त्याचा हा निर्णय ‘मास्टर स्ट्रोक’ सिद्ध झाला. न्यूझीलंडला अखेरच्या दहा षटकांत केवळ ६२ धावा काढता आल्या.त्याआधी, नाणेफेक जिंकताच फलंदाजी घेणाऱ्या न्यूझीलंडची सुरुवात झकास झाली. कर्णधार केन विलियम्सन याने ६९ चेंडूत ५७ आणि रॉस टेलरने ८२ चेंडूत ६३ धावांचे योगदान दिले. निर्णायक टप्प्यात फलंदाजांना धावांची लय राखण्यात अपयश आल्याने न्यूझीलंडला ३०० चा पल्ला गाठणे कठीण गेले. ३९ षटकांत ३ बाद २०१ अशी स्थिती होती. गुप्तिल (३३) आणि ल्यूक रोंची(१६) हे फॉर्ममध्ये असताना आठव्या षटकांत बाद झाले. त्यानंतर विलियम्सन आणि टेलर यांनी खेळाची सूत्रे सांभाळली.(वृत्तसंस्था)