शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

मी कोहलीप्रति सन्मान गमावला आहे

By admin | Updated: March 7, 2017 00:40 IST

भारताचा कर्णधार विराट कोहलीकडून सातत्याने होत असलेल्या स्लेजिंगमुळे मी त्याच्याप्रति असलेला सन्मान गमावला

मेलबर्न : भारताचा कर्णधार विराट कोहलीकडून सातत्याने होत असलेल्या स्लेजिंगमुळे मी त्याच्याप्रति असलेला सन्मान गमावला आहे, असे वक्तव्य आॅस्टे्रलियाचा माजी दिग्गज यष्टीरक्षक इयान हिली यांनी केले. त्याच वेळी, आॅस्टे्रलियाचाच माजी सलामीवीर सायमन कॅटिचने मात्र या प्रकरणाला अधिक महत्त्व न देता, क्रिकेटच्या एका मर्यादेमध्ये या सर्व गोष्टी होतच असतात, असे म्हटले. हिली यांनी याप्रकरणी पुढे सांगितले की, ‘‘कोहलीने आॅस्टे्रलियाचा अपमान केला आणि भारतीय कर्णधाराला आपल्या मैदानी आक्रमकतेला काही प्रमाणात कमी करण्याची गरज होती. त्याच्या या भूमिकेमुळे संघसहकाऱ्यांवरही दबाव येत आहे.’’ मात्र, हिली यांच्या वक्तव्याशी कॅटिच सहमत नाही. कॅटिच म्हणाला की, ‘‘दोन्ही संघांनी आपल्या मर्यादा ओलांडलेल्या नाहीत. कसोटी क्रमवारीतील अव्वल दोन स्थानावरील संघांंमधील कसोटी मालिकेतील थरार हा उच्च असतो. तेव्हा या सर्व गोष्टी होणे अपेक्षितच आहे.’’आॅस्टे्रलियाकडून ११९ कसोटी सामने खेळलेल्या हिली यांनी मेलबर्न रेडिओ स्टेशनवरील मुलाखतीमध्ये बोलताना सांगितले की, ‘‘कोहलीवरील दबाव स्पष्ट दिसू लागला आहे. त्याच्याप्रति असलेला सन्मान मी गमावत चाललो आहे. त्याला आपल्या प्रतिस्पर्धी संघाचा आदर राखण्याची आवश्यकता आहे. स्टीव्ह स्मिथसह त्याने जे काही केले ते अयोग्य होते.’’दुसरीकडे, कॅटिचने कोहली आणि स्मिथने दबावाचा चांगल्याप्रकारे सामना केल्याचे म्हटले. त्याने सांगितले की, ‘‘माझ्या मते दोन्ही खेळाडू चांगल्याप्रकारे दबावाला सामोरे जात आहेत. या मालिकेत अनेक भावना जोडल्या गेलेल्या आहेत. भारतीय संघ बळी घेण्यास आसुसलेला होता. स्मिथचा बळी किती महत्त्वपूर्ण आहे याची जाणीव त्यांना होती. ईशांत-स्मिथ यांच्यातील प्रसंग सर्वांनाच धक्कादायक होता. परंतु, स्मिथसह ईशांतनेही संयम ठेवताना तो प्रसंग हसण्यावर नेला. एकूणच, दोन्ही कर्णधार कौतुकास पात्र आहेत. त्यांनी सामन्यातील स्थिती चांगल्याप्रकारे हाताळली आहे.’’ (वृत्तसंस्था)