शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

बॉक्सर्सच्या पराभवासाठी मी जबाबदार - संधू

By admin | Updated: August 27, 2016 17:58 IST

रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॉक्सर्स पदक जिंकण्यात अपयशी ठरले. या अपयशाची नैतिक जबाबदारी राष्ट्रीय कोच गुरुबक्षसिंग संधू यांनी स्वीकारली आहे

- ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॉक्सर्स पदक जिंकण्यात अपयशी ठरले. या अपयशाची नैतिक जबाबदारी राष्ट्रीय कोच गुरुबक्षसिंग संधू यांनी स्वीकारली आहे.
 
एकेकाळी वेगवान प्रगती साधत असलेली भारतीय बॉक्सिंग संघटना गेल्या चार वर्षांत राजकारणात अडकताच निर्माण झालेला प्रशासकीय गलथानपणा देखील या पराभवास जबाबदार असल्याचे संधू म्हणाले. जे झाले त्याचे मला दु:ख आहे. पण सध्याच्या परिस्थितीत तिन्ही बॉक्सर्सनी बजावलेली कामगिरी समाधानकारक होती, असे माझे वैयक्तिक मत आहे. त्यांना कठीण ड्रॉ मिळाला. परिस्थिती नियंत्रणात आहे असे वाटत होते पण गेल्या चार वर्षांत काहीही काम झाले नाही.
 
बीजिंगमध्ये विजेंदरने तर लंडनमध्ये मेरिकोमने कांस्य जिंकले. यंदाही भारताला पदक मिळेल अशी आशा होती पण पात्रता गाठणारे तिन्ही बॉक्सर अपयशी ठरले. यासंदर्भात संधू म्हणाले,‘माझे सर्व बॉक्सर पदक विजेत्यांविरुद्ध पराभूत झाले. मी कुणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणार नाही पण आम्हाला सत्यस्थिती समजावी लागेल. आमचा ‘ड्रॉ’ देखील कठीण होता.’ शिवा थापा (५६ किलो) हा क्यूबा रोबेसी रमिरेझकडून पराभूत झाला. रमिरेझ सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. ६४ किलो गटात मनोज कुमार हा सुवर्ण विजेता उझबेकिस्तानचा फझलीउद्दीन गेइबनाझारोव्ह याच्याकडून पराभूत झाला. विकास कृष्णन्ला रौप्य विजेता मेलिकूझेव्ह याने नमविले होते. 
 
संधू पुढे म्हणाले,‘आमच्या बॉक्सरपुढील आव्हान असमूज घ्या. बॉक्सिंगच्या प्रगतीसाठी अहंकार सोडून एकत्र आले पाहिजे. भक्कम राष्ट्रीय महासंघाअभावी आम्ही सर्वजण अनाथ आहोत, ही आमची कळकळ समजून घ्या. पाया मजबूत असल्याशिवाय काहीच होणार नाही. महासंघ नसेल तर आंतरराष्ट्रीय स्तरावर तुमचे कुणी ऐकणार नाही. तांत्रिक प्रतिनिधित्व देखील मिळणार नाही. आमच्या खेळाडूंना सरावाच्या सर्व सुविधा मिळाल्या पण प्रतिस्पर्धा करण्यासाठी विदेशी अनुभव मात्र मिळू शकला नव्हता.’
 
आमच्या खेळाडूंना सध्याच्या तुलनेत यापूर्वी कधीही चांगल्या सोई मिळाल्या नव्हत्या. साईच्या  हासंचालकांकडूनही सर्व सोई उपलब्ध होऊ शकल्या. पण बॉक्सिंग महासंघाच्या निलंबनामुळे आमच्या खेळाडूंना कझाखस्तान, उझबेकिस्तान किंवा क्युबामध्ये सरावाच्या सुविधा उपलब्ध होऊ शकल्या नव्हत्या. या देशांमध्ये स्पर्धा खेळण्यासाठी देखील आमच्या खेळाडूंना बोलविण्यात आले नव्हते. यासाठीच भक्कम महासंघाची गरज आहे. महासंघ तयार करून भारताला विश्व बॉक्सिंग सिरिजमध्ये स्थान मिळवून घ्यावे लागेल. जे खेळाडू सिरिज आणि आंतरराष्ट्रीय लीग खेळत राहतात त्यांचेच ऑलिम्पिक
बॉक्सिंगवर वर्चस्व राहिले हे विशेष.