शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

हैदराबादचा मुंबईवर 85 धावांनी नेत्रदीपक विजय

By admin | Updated: May 8, 2016 21:24 IST

सनरायझर्स हैदराबादनं मुंबई इंडियन्सवर 85 धावांनी नेत्रदीपक विजय मिळवला आहे.

 ऑनलाइन लोकमत

विशाखापट्टणम, दि. 8- सनरायझर्स हैदराबादनं मुंबई इंडियन्सवर 85 धावांनी नेत्रदीपक विजय मिळवला आहे. सनरायझर्स हैदराबादनं दिलेलं 177 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची दमछाक उडाली आहे. मुंबई इंडियन्सला 16.3 षटकांत सर्व गड्यांच्या मोबदल्यात 92 धावा काढता आल्यात.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालीच मुंबई इंडियन्सच्या खराब कामगिरीला सुरुवात झाली. कुमारनं पार्थिव पटेलला धावचीत केले. तर नेहरानं भेदक गोलंदाजीच्या जोरावर शर्मा, रायुडू, बलटरचा तंबूत परत पाठवलं. सरणनं पांड्याला तर हेनरिकनं पोलार्डला घरचा रस्ता दाखवला आहे. रेहमाननं गोलंदाजीचं चमक दाखवून पांड्या, साऊथी, मेक्लॅघनचा बळी घेतला आहे.
विजयाची आशा बाळगून खेळणा-या सनरायझर्स हैदराबादनं मुंबई इंडियन्ससमोर 20 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात 178 धावांचं आव्हान ठेवलं होतं. कर्णधार वार्नरनं 33 चेंडूंत 7 चौकार आणि 1 षटकार खेचत 48 धावा केल्यात. शिखर धवननं नाबाद 57 चेंडूंत 10 चौकार  आणि 1 षटकार मारून 82 धावा काढून हाफसेंचुरी पार केली. विल्यमसन 2 धावा काढून तंबूत परतला आहे. युवराज सिंगनं 3 चौकार आणि 2 षटकार लगावत 39 धावा कुटल्यात. हेनरिक नाबाद खेळी करत 1 धावा काढली आहे. मुंबई इंडियन्सच्या मॅक्लेघननं युवराज सिंगला धावचीत केलं. हरभजननं भेदक गोलंदाजीच्या जोरावर डेव्हिड वॉर्नर आणि विल्यमसनला तंबूत पाठवलं आहे.