शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

यजमान सीसीआय उपांत्य फेरीत

By admin | Updated: June 13, 2015 01:40 IST

यजमान सीसीआय आणि कसलेल्या एमआयजी क्लब या संघांनी आपापल्या सामन्यात निर्णायक बाजी मारताना कानजी स्मृती ज्युनियर

मुंबई : यजमान सीसीआय आणि कसलेल्या एमआयजी क्लब या संघांनी आपापल्या सामन्यात निर्णायक बाजी मारताना कानजी स्मृती ज्युनियर चषक आंतर क्लब बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.क्रिकेट क्लब आॅफ इंडिया येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत यजमानांनी ३-० असा सहज विजय मिळवताना खार जिमखानाचा धुव्वा उडवला. मुलींच्या एकेरी सामन्यात ह्रीष्णा दुबेने मान्या अवलानीचा २१-१०, २१-१० असा पराभव केल्यानंतर वरुण दवे यानेदेखील सरळ दोन सेटमध्ये बाजी मारताना देवांश मेहरोत्राचा २१-१५, २१-१३ असा फडशा पाडून सीसीआयला २-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतरच्या दुहेरी सामन्यात करीना मदन - रिया अरोलकर यांनी आक्रमक खेळ करताना राधिका - तन्वी यांचा २१-१८, २१-६ असा धुव्वा उडवून सीसीआयला उपांत्य फेरीत नेले.एमआयजी क्लबनेदेखील सफाईदार विजयासह कूच करताना एनएससीआयचा ३-० असा दणदणीत पराभव केला. मुलींच्या एकेरीच्या लढतीत पहिला सेट गमावून पिछाडीवर पडल्यानंतर रुद्रा राणे हिने जबरदस्त पुनरागमन करताना सामीआ शाहचा १८-२१, २१-१९, २१-१० असा पाडाव केला. यानंतरच्या मुलांच्या एकेरी सामन्यात वेदान्त शाहने तुफान आक्रमक खेळ करताना नील गांधीचा २१-२, २१-४ असा चुराडा करून एमआयजीची आघाडी २-० अशी भक्कम केली. तर, मुलींच्या दुहेरी सामन्यात सानिया शिवलकर - रुद्रा राणे यांनी सरळ दोन सेटमध्ये बाजी मारताना सामीआ शाह - अंगेला यांचा २१-१३, २१-५ असा धुव्वा उडवून एमआयजीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.त्याचवेळी दुसऱ्या बाजूला गोरेगाव एससी संघानेदेखील दिमाखात उपांत्य फेरी गाठताना कसलेल्या कॅथलिक जिम संघाला ३-० असा अनपेक्षित धक्का दिला. तसेच माटुंगा जिमखानाने एकतर्फी झालेल्या सामन्यात अनुभवी पीजे हिंदू जिमखाना संघाला कोणतीही संधी न देता ३-० असे नमवले आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. (क्रीडा प्रतिनिधी)