शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

भारतासमोर विजयासाठी यजमान बेल्जियमचे कडवे आव्हान

By admin | Updated: July 3, 2015 04:23 IST

भारतीय पुरुष हॉकी संघाला एफआयएच हॉकी वर्ल्ड लीग सेमीफायनल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत यजमान बेल्जियमच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

एंटवर्प : भारतीय पुरुष हॉकी संघाला एफआयएच हॉकी वर्ल्ड लीग सेमीफायनल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत यजमान बेल्जियमच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. शुक्रवारी खेळल्या जाणाऱ्या उपांत्य लढतीत भारताच्या बचाव फळीपुढे यजमान संघाचे आक्रमण रोखण्याचे कडवे आव्हान राहणार आहे. बेल्जियम संघाच्या कामगिरीमध्ये गेल्या दोन वर्षांत चांगली सुधारणा झाली आहे. त्यामुळे त्यांनी प्रथमच विश्वक्रमवारीत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या भारतीय संघासाठी यजमान संघाचा पराभव करीत अंतिम फेरीत स्थान मिळविणे सोपे नाही. बेल्जियमच्या खेळाडू्ंनी आंतरराष्ट्रीय हॉकी वर्तुळाला दखल घेण्यास भाग पाडले आहे. बेल्जियमने चॅम्पियन्स चॅलेंज स्पर्धेत भारताविरुद्ध विजय मिळविल्यानंतर २०१२ आॅलिम्पिक व २०१४ ची विश्वकप स्पर्धा यामध्येही पराभूत केले होते. भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत मेलबोर्न व भुवनेश्वर येथे सलग दोनदा बेल्जियमचा पराभव केला होता. आपल्यापेक्षा वरचे मानांकन असलेल्या बेल्जियमविरुद्धच्या लढतीसाठी सज्ज असलेल्या भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक पॉल वान एस म्हणाले,‘बेल्जियमविरुद्ध खेळणे आमच्या शैलीसाठी अनुकूल आहे. आम्ही या लढतीसाठी सज्ज आहोत. वान एस यांच्या मते भारतीय संघ आशियाई संघांना कडवे प्रतिस्पर्धी मानते. बुधवारी मलेशियाविरुद्ध ३-२ ने विजय मिळविताना याची प्रचिती आली. भारताला या लढतीत कसून मेहनत घ्यावी लागेल. बेल्जियमने बुधवारी उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत फ्रान्सची झुंज ५-४ ने मोडून काढली आणि उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले. या लढतीत टॉम बून व कर्णधार जॉन डोहमेन यांनी शानदार खेळ केला. व्ही.आर. रघुनाथ व रुपिंदर पाल सिंग यांच्या अनुपस्थितीत जसजितसिंगने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करीत भारताची ड्रॅग फ्लिकरची उणीव बऱ्याच अंशी कमी केली. वान एस पुढे म्हणाले, ‘आमच्याकडे अन्य पर्याय आहेत. मला ड्रॅग फ्लिक आवडतो, पण आम्हाला त्यापासून अधिक सावध राहण्याची गरज आहे.’ (वृत्तसंस्था)