शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

घरच्या मैदानात मुंबईचे पारडे जड

By admin | Updated: April 22, 2017 16:27 IST

मुंबईच्या वानखेडे मैदानावर रात्री ८ वाजता मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली डेअरडेविल्सचा सामना रंगणार आहे. मात्र मुंबई इंडियन्सचे पारडे या सामन्यात जड वाटत आहे.

ऑनलाईन लोकमत

मुंबई, दि. 22 - मुंबईच्या वानखेडे मैदानावर रात्री ८ वाजता मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली डेअरडेविल्सचा सामना रंगणार आहे. मात्र मुंबई इंडियन्सचे पारडे या सामन्यात जड वाटत आहे. युवा खेळाडू नितिश राणा, किरोन पोलार्ड, जोश बटलर, पार्थिव पटेल, रोहित शर्मा या फलंदाजांना रोखण्याचे आव्हान दिल्लीसमोर असेल. मुंबईच्या तुलनेत दिल्लीची फलंदाजी काहीशी कमकुवत आहे. दिल्लीची सुरूवात करणारा संजू सॅमसन आणि रिषभ पंत फॉर्ममध्ये आहे.
 
मात्र त्यांना श्रेयस अय्यर इतर फलंदाजांची साथ लाभत नाही. मुंबईचा संघ समतोल आहे. दमदार फलंदाजीसोबतच उत्तम गोलंदाजांचा ताळमेळ मुंबई संघात आहे. त्यामुळे मुंबईचा संघ इतर संघांवर वर्चस्व गाजवत गुणतक्त्यात पहिल्या स्थानावर आहे.
मुंबईची गोलंदाजी काहीशी चिंतेची बाब आहे. जसप्रीत बुमराह, लसीथ मलिंग, मिशेल मॅक्लेघन यांची गेल्या सामन्यात आमला आणि मॅक्सवेल यांनी चांगलीच धुलाई केली होती. तर हरभजन सिंहलाही फारसे यश मिळाले नव्हते. गोलंदाजीचा विचार करता दिल्लीची गोलंदाजी जहीर खानमुळे   जरा मजबूत आहे. मात्र दिल्लीकडे मॅचविनर खेळाडूंची वानवा आहे. 
 
 
मॅथ्युज् , बिलिंग्ज हे सातत्याने अपयशी ठरलेत. मुंबईकडे पंड्या बंधुंच्या रुपाने मॅचविनर खेळाडू आहेत. कृणाल आणि हार्दिक हे फटकेबाजी करून संघाला कोणत्याही अडचणीतून बाहेर काढू शकतात. तर दोघांनी गोलंदाजीतही चमक दाखवली आहे. कृणालने केकेआर विरोधात ३ गडी बाद केले होते. तर सनरायजर्स आणि आरसीबी विरोधात दमदार ३७ धावांची खेळी केली होती. हार्दिकने तर आयपीएलच्या या सत्रात मुंबईकडून दमदार फटकेबाजी केली आहे.