शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

हॉकी : भारताने कॅनडाचा उडवला धुव्वा; आज पाकिस्तानशी लढत

By admin | Updated: June 18, 2017 03:16 IST

भारताने आपली विजयी घोडदौड कायम ठेवताना आज येथे हॉकी विश्व लीग सेमीफायनलमध्य कॅनडाचा ३-0 असा धुव्वा उडवताना आपला सलग दुसरा विजय नोंदवला.

लंडन : भारताने आपली विजयी घोडदौड कायम ठेवताना आज येथे हॉकी विश्व लीग सेमीफायनलमध्य कॅनडाचा ३-0 असा धुव्वा उडवताना आपला सलग दुसरा विजय नोंदवला. भारतासाठी एस. व्ही. सुनीलने पाचव्या मिनिटाला, आकाशदीपसिंहने १0 व्या मिनिटाला आणि सरदारसिंह याने १८ व्या मिनिटाला गोल करीत ब गटाच्या सामन्यात पूर्ण तीन गुण मिळवून दिले. या विजयाने भारताने स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरी जवळपास निश्चित केली आहे. भारताने गुरुवारी सुरुवातीच्या लढतीत स्कॉटलंडवर ४-१ गोलने दणकेबाज विजय नोंदवला होता. आता सहाव्या मानांकित भारताचा पुढील सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध आहे.

क्रिकेट, हॉकीत एकाच वेळी भारत-पाक लढत..भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी दुसऱ्या देशात क्रिकेट आणि हॉकीच्या मैदानावर असतील तेव्हा विराट कोहलीचा सुरेख ड्राइव्ह आणि हरमनप्रीतसिंह याचा शक्तिशाली ड्रॅगफ्लिकचा नजारा एकाच वेळेस पाहायला मिळणार आहे. भारतीय क्रिकेट संघ लंडनमध्ये ओव्हलमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानशी दोन हात करणार आहे, तर त्यापासून ५५ मैलांपेक्षा कमी अंतरावर राष्ट्रीय पुरुष हॉकी संघ मिल्टन येथे आपल्या पारंपरिक संघाविरुद्ध खेळणार आहे.क्रिकेट आणि राष्ट्रीय खेळांदरम्यान एकाच वेळी रसिकांना आकर्षित करण्याचा योग असा फारच कमी असतो. त्यामुळे इंग्लंडमध्ये राहणारे भारतीय सुपर संडेचा जल्लोष साजरा करण्यास उपस्थित राहतील.बॉलीवूड ब्रिगेड, राजकीय दिग्गज आणि प्रसिद्ध व्यक्ती क्रिकेटला उपस्थिती दशर्वण्याची शक्यता आहे, तर हॉकी विश्व लीग सेमीफायनलची लढतदेखील आकर्षण बिंदू ठरणार आहे.जे क्रीडाप्रेमी क्रिकेटचे तिकीट खरेदी करू शकले नाहीत ते जवळपास एक तास अंतरावर असणाऱ्या मिल्टन केन्स येथे जाऊन मनप्रीतसिंह आणि एस. व्ही. सुनील यांच्यासारख्या खेळाडूंच्या कौशल्याचे साक्षीदार ठरू शकतात. पाकिस्तानविरुद्ध खेळातील स्पर्धाच नव्हे तर भारतीय जनतेत लढतीदरम्यान राष्ट्रप्रेम पाहायला मिळते. (वृत्तसंस्था)