शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

हॉकी

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

दीनानाथची एसएफएसवर ५-० ने मात

दीनानाथची एसएफएसवर ५-० ने मात
व्हीएचए आंतरमहाविद्यालय हॉकी : हिस्लॉप संघाचा विजय
नागपूर : विदर्भ हॉकी संघटनेतर्फे आयोजित आंतरमहाविद्यालय हॉकी स्पर्धेत गुरुवारी खेळल्या गेलेल्या लढतीत एसएफएस व हिस्लॉप महाविद्यालच्या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. व्हीएचएच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या लढतींमध्ये दीनानाथने एसएफएसचा ५-० ने तर हिस्लॉप महाविद्यालयाने जीएस महाविद्यालयाचा २-० ने पराभव केला.
पहिल्या लढतीत दीनानाथने सुरुवातीपासून वर्चस्व गाजवले. नवव्या मिनिटाला नवीन काथोटेने संघाचे खाते उघडले. त्यानंतर तीन मिनिटांनी पीयूष गौरने संघातर्फे दुसरा गोल नोंदविला. अकबर अन्सारीने १५ व्या मिनिटाला दीनानाथ संघाला ३-० अशी आघाडी मिळवून दिली. राहुल कलाकोटी (२२ वा मिनिट) आणि मोहित काथोटे (२६ वा मिनिट) यांनी चार मिनिटांच्या अंतरात प्रत्येकी एक गोल नोंदवीत संघाचा विजय निश्चित केला.
अन्य सामन्यात अश्विन झेव्हिअरने (६ वा मिनिट) सुरुवातीलाच गोल नोंदवीत हिस्लॉप संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. १-० ने पिछाडीवर पडलेल्या जीएस संघाच्या खेळाडूंनी त्यानंतर आक्रमक खेळ केला. पण त्यांना हिस्लॉप संघाच्या बचाव फळीला भेदण्यात अपयश आले. २४ व्या मिनिटाला अंशुल खांडेकरने चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखवीत हिस्लॉप संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
शुक्रवारी या स्पर्धेत दीनानाथ विरुद्ध ज्योतिबा शारीरिक शिक्षण महाविद्यालय (सकाळी ९.३० वाजता) आणि सिंधू महाविद्यालय विरुद्ध हिस्लॉप महाविद्यालय (सकाळी १०.३० वाजता) संघांदरम्यान लढती होतील. (क्रीडा प्रतिनिधी)