शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

सतनामने रचला इतिहास

By admin | Updated: June 27, 2015 01:16 IST

भारताच्या सतनाम सिंग या बास्केटबॉलपटूने इतिहास घडवला आहे. जगातील सर्वात लोकप्रिय असलेल्या एनबीए या अमेरीकेच्या बास्केटबॉल लीग स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे

नवी दिल्ली : भारताच्या सतनाम सिंग या बास्केटबॉलपटूने इतिहास घडवला आहे. जगातील सर्वात लोकप्रिय असलेल्या एनबीए या अमेरीकेच्या बास्केटबॉल लीग स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी निवड झालेला सतनाम हा पहिला वहिला भारतीय असल्याने जागतिक बास्केटबॉल क्षेत्रामध्ये भारताचे नाव चमकले आहे.तब्बल ७ फूट २ इंच उंचीचा सतनाम एनबीएमध्ये डैलस मैवरिक्स या संघाकडून खेळणार असून एनबीए स्पर्धेच्या एकुन ७१ वर्षांच्या इतिहासामध्ये खेळणार तो पहिला भारतीय ठरणार आहे. सतनाम सिंग भामरा असे पुर्ण नाव असलेला हा खेळाडू अमेरीकेच्या फ्लोरीडा शहरातील आयएमजी अकादमीमध्ये शिकत असून या कालवधीत कॉलेज स्तरावरील बास्केटबॉल स्पर्धांत सतनामने आपल्या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. यामुळेच डैलस मैवरिक्स संघाने त्याला करारबध्द केले. विशेष म्हणजे डैलस संघाने २०११ साली एनबीएचे विजेतेपद पटकावले होते. शिवाय या संघामध्ये डर्क नोविट्जस्की सारख्या स्टार खेळाडंूचा समावेश आहे.दरम्यान, गुरसिमरन ‘सिम’ भुल्लर एप्रिल महिन्यात सैक्रोमेंटो किंग्स संघाकडून एनबीए स्पर्धेत खेळणारा पहिला भारतीय वंशाचा खेळाडू ठरला होता. डैलास संघाबाबत सांगायचे झाल्यास १९८०-८१ पासून या संघाने सुरुवात केल्यानंतर तीन डिव्हीजन विजेतेपद (१९८७, २००७ आणि २०१०), दोन कॉन्फ्रन्स अजिंक्यपद (२००६ आणि २०११) आणि एक एनबीए विजेतेपद (२०११) पटकावले आहेत. त्याचवेळी सतनाम यापूर्वी एकूण ७ विविध संघाकडून खेळला असून यामध्ये बोस्टन कैलटिक्स, सैक्रोमेंटो किंग्स, वॉशिंग्टन विजडर्स, डैलास मैवरिक्स, ह्यूस्टन रॉकेट्स, सैन एंटिनिओ आणि पोर्टलैंड ट्रायलबेलजर्स या संघांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)