शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
3
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
4
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
5
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
6
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
7
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
8
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
9
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
10
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
11
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
12
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
13
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
14
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
15
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
16
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
17
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
18
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
19
पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !
20
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'

हेराथमुळे टीम इंडियाचे ‘हे राम’

By admin | Updated: August 15, 2015 23:53 IST

पहिल्या तीन दिवसांमध्ये वर्चस्व राखून सामना आपल्या बाजूने झुकवल्यानंतरही फलंदाजांनी केलेल्या हाराकीरीमुळे भारताला श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात ६३ धावांनी

गॅले : पहिल्या तीन दिवसांमध्ये वर्चस्व राखून सामना आपल्या बाजूने झुकवल्यानंतरही फलंदाजांनी केलेल्या हाराकीरीमुळे भारताला श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात ६३ धावांनी निराशाजनक हार पत्करावी लागली. श्रीलंकेने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतले आहे. दुसऱ्या डावात निर्णायक नाबाद दिडशतक झळकावून संघाला विजयी करणाऱ्या दिनेश चंडीमलला सामनावीर म्हणून घोषित केले. तर लंकेच्या रंगना हेराथने ७ गडी बाद करताना भारतीयांचे कंबरडे मोडले. १७६ धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव ११२ धावांत ढेपाळला.नाइट वॉचमन म्हणून फलंदाजीला आलेल्या इशांत शर्माच्या रुपाने हेराथने भारताला चौथ्या दिवशी पहिला झटका दिला. २ बाद ३० अशा अवस्थेतून सावरत असतानाच हेराथने फॉर्मशी झगडत असलेल्या रोहित शर्माचा त्रिफळा उडवताना भारताला मोठा धक्का दिला. रोहितने २३ चेंडूचा सामना करताना केवळ १० धावा काढल्या. यानंतर लगेच थरींदू कौशलने कर्णधार विराट कोहलीला (३) बाद केले आणि नंतर १५ धावांच्या अंतराने सलामीवीर शिखर धवनचा (२८) स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल घेऊन संघाच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. अर्धा संघ ६० धावांमध्ये बाद झालेला असतानाच भारताच्या पराभवाची चाहूल लागली. यानंतर वृध्दिमान साहा (२), हरभजन सिंग (१) आणि आर. अश्विन (३) हेराथचे शिकार ठरल्याने भारताची ८ बाद ८१ धावा अशी केविलवाणी अवस्था झालेली. यावेळी सर्वांच्या नजरा होत्या त्या दुसऱ्या टोकावरुन झुंजारपणे खेळणाऱ्या मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या फलंदाजीकडे. त्याने संघाकडून सर्वाधिक ३६ धावांची झुंजार खेळी केली. मात्र इतर फलंदाजांकडून योग्य साथ न मिळाल्याने त्याची झुंज अपयशीच ठरली. (वृत्तसंस्था)

धावफलक ....श्रीलंका : पहिला डाव - सर्वबाद १८३ धावा आणि दुसरा डाव - सर्वबाद ३६७ धावा. भारत : पहिला डाव - सर्वबाद ३७५ धावा. आणि दुसरा डाव - राहूल पायचीत गो. हेराथ ५, धवन झे. व गो. कौशल २८, इशांत शर्मा पायचीत गो. हेराथ १०, रोहित शर्मा त्रि. गो. हेराथ ४, विराट झेल सिल्वा गो. कौशल ३, अजिंक्य रहाणे झे. मॅथ्यूज गो. हेराथ ३६, साहा यष्टीचीत चंडिमल गो. हेराथ २, हरभजन सिंग झे. सिल्वा गो. हेराथ १, अश्विन झे. प्रसाद गो. हेराथ ३, मिश्रा झे. करुणारत्ने गो. कौशल १५, वरुण अ‍ॅरोन नाबाद १. अवांतर - ४. एकूण : सर्वबाद ११२ धावा. गोलंदाजी : धम्मीका प्रसाद ४-२-४-०; रंगना हेराथ २१-६-४८-७; थरींदू कौशल १७.५-१-४७-३; नुवान प्रदीप ६-३-८-०; अँजेलो मॅथ्यूज १-०-३-०.