शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
4
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
5
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
6
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
7
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
8
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
9
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
10
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
11
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
12
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
13
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
14
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
15
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
16
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
17
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
18
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
19
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

जिंकेल तो आत, हरेल तो बाहेर !

By admin | Updated: March 27, 2016 03:39 IST

जेतेपदाचा सर्वांत प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या ‘टीम इंडिया’ने टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या तिन्ही सामन्यांत प्रतिष्ठेला साजेशी कामगिरी केली नसल्याने ग्रुप दोनमधून बाद फेरी

मोहाली : जेतेपदाचा सर्वांत प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या ‘टीम इंडिया’ने टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या तिन्ही सामन्यांत प्रतिष्ठेला साजेशी कामगिरी केली नसल्याने ग्रुप दोनमधून बाद फेरी गाठण्यासाठी संघापुढे अवघड आव्हान उभे ठाकले आहे. स्पर्धेची उपांत्य फेरी गाठायची झाल्यास आज, रविवारी आॅस्ट्रेलियाचा अडथळा दूर करणे अनिवार्य असेल. त्यासाठी सर्व आघाड्यांवर सरस कामगिरी करण्याचे आव्हान राहील.पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताला ४७ धावांनी पराभूत केले. दुसऱ्या सामन्यात भारताने पाकवर सहा गड्यांनी विजय साजरा केला. तिसऱ्या सामन्यात बांगला देशच्या फलंदाजांनी बेजबाबदार फटके मारले नसते आणि कर्णधार धोनीने शक्कल लढवून धावबाद केले नसते, तर भारताला एका धावेने विजय मिळू शकला नसता. आॅस्ट्रेलियाने मात्र सामन्यागणिक कामगिरी सुधारली. पाकला ‘करा किंवा मरा’ लढतीत नमवित दावा भक्कम केला. जेम्स फॉल्कनर आणि शेन वॉटसन यांच्या मते भारताला त्यांच्या भूमीत नमविणे तसे कठीणच. पण आॅस्ट्रेलियावर विजय मिळविणे सोपे नाही, हे यजमान संघाला चांगले ठाऊक आहे. जानेवारीत भारतीय संघाने आॅस्ट्रेलियाला त्यांच्या मैदानावर तीन सामन्यांच्या मालिकेत नमविले होते. त्यावेळी वेगळा संघ होता. यावेळी परिस्थितीही वेगळी आहे. भारताचे स्टार फलंदाज अद्याप चमकलेले नाहीत. रोहीत शर्मा, शिखर धवन यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. विराट कोहलीवर सर्वाधिक भिस्त राहील. रैनाने बांगला देशविरुद्ध ३० धावा केल्या तरीही त्याला आणि युवराजला योगदान द्यावेच लागेल. बांगला देशविरुद्ध भारताचे क्षेत्ररक्षण फारसे चांगले नव्हते. पाकिस्तान आणि बांगला देशला नमविताना जी दमछाक झाली त्यातून बोध घेणार आहोत. टी-२० मध्ये फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात भरीव कामगिरी करणे तसेच भावनांवर नियंत्रण राखणे आवश्यक असते. आॅस्ट्रेलियाला नमविण्यासाठी नेमके हेच करावे लागेल. आॅस्ट्रेलियाला नमविणे कठीण आहे पण जानेवारीत ३-० ने मिळालेल्या विजयापासून प्रेरणा घेऊ. त्यांना कसे हरवायचे याकडे लक्ष देत आहोत. - विराट कोहली.भारताला भारतात नमविणे अत्यंत कठीण असले तरी आम्ही उद्याच्या सामन्यासाठी सज्ज आहोत. आम्ही रनरेटकडे न बघता थेट विजयासाठीच खेळणार आहोत. भारताला भारतात पराभूत करण्यासाठी आम्हाला सर्वोत्तम खेळी करावी लागेल. माझा हा अखेरचा सामना ठरू शकतो. भारत अद्याप क्षमतेनुरूप खेळलेला नाही तरीही या संघाविरुद्ध खेळणे अवघड आव्हान असते. - शेन वॉटसनसंघ यातून निवडणारभारत : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), विराट कोहली, सुरेश रैना, रोहीत शर्मा, युवराज सिंग, रवीचंद्रन अश्विन, जसप्रित बुमराह, शिखर धवन, हरभजन सिंग, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, पवन नेगी, आशिष नेहरा, हार्दिक पंड्या, अजिंक्य रहाणे. आॅस्ट्रेलिया : स्टीवन स्मिथ (कर्णधार), शेन वॉटसन, डेव्हिड वॉर्नर, एश्टोन एगर, जेम्स फॉल्कनर, जॉन हेस्टिंग्स, उस्मान ख्वाजा, ग्लेन मॅक्सवेल, अ‍ॅण्ड्र्यू टाये, अ‍ॅडम जम्पा, पीटर नेव्हिल, मिशेल मार्श, जोश हेजलवुड, अ‍ॅरोन फिंच, नाथन कुल्टर नाईल. पीसीए स्टेडियम, मोहालीसायंकाळी ७.३० पासून