शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

हर्षा जोड

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

टीम इंडियातर्फे आतापर्यंत चमकदार कामगिरी करणारा भुवनेश्वर कुमारही संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. स्पिन केवळ भारताची शक्ती नसून धोनीसाठी कम्फर्ट झोन ठरत आहे. ज्यावेळी चेंडू थांबून येतो आणि टर्न होतो त्यावेळी धोनीचे नेतृत्व उल्लेखनीय ठरत असल्याचे दिसून येते. क्षेत्ररक्षणही दर्जेदार भासते आणि कामचलावू गोलंदाजही सेट फलंदाजांवर वर्चस्व गाजवितात, पण ऑस्ट्रेलियातील खेळप˜्या टणक आहेत. फिरकीपटूंना या खेळप˜ीकडून मदत मिळविण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागतात. येथे भारतीय संघ पिछाडीवर असल्याचे दिसून येते. खेळप˜ीकडून मदत मिळविण्यासाठी मेहनत घेणे आवश्यक आहे. त्यामुळे फलंदाजांवर अधिक धावा फटकाविण्याचे दडपण राहणार आहे. जर चांगली सुरुवात मिळाली तर भारतीय फलंदाजांमध्ये मोठी धावसंख्या उभारण्याची क्षमता आहे. असे जर घडले तर भारतीय फलंदा

टीम इंडियातर्फे आतापर्यंत चमकदार कामगिरी करणारा भुवनेश्वर कुमारही संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. स्पिन केवळ भारताची शक्ती नसून धोनीसाठी कम्फर्ट झोन ठरत आहे. ज्यावेळी चेंडू थांबून येतो आणि टर्न होतो त्यावेळी धोनीचे नेतृत्व उल्लेखनीय ठरत असल्याचे दिसून येते. क्षेत्ररक्षणही दर्जेदार भासते आणि कामचलावू गोलंदाजही सेट फलंदाजांवर वर्चस्व गाजवितात, पण ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या टणक आहेत. फिरकीपटूंना या खेळपट्टीकडून मदत मिळविण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागतात. येथे भारतीय संघ पिछाडीवर असल्याचे दिसून येते. खेळपट्टीकडून मदत मिळविण्यासाठी मेहनत घेणे आवश्यक आहे. त्यामुळे फलंदाजांवर अधिक धावा फटकाविण्याचे दडपण राहणार आहे. जर चांगली सुरुवात मिळाली तर भारतीय फलंदाजांमध्ये मोठी धावसंख्या उभारण्याची क्षमता आहे. असे जर घडले तर भारतीय फलंदाज वर्चस्व गाजविण्यास सज्ज आहेत. रोहित शर्मा, शिखर धवन, सुरेश रैना हे भारतीय फलंदाज मॅच विनर ठरू शकतात, पण त्यात ते लवकर बाद होण्याचा धोकाही असतो. त्यामुळे भारतीय संघाची भिस्त विराट कोहलीवर अधिक अवलंबून आहे. कोहली फॉर्मात असला तर दडपण झुगारण्यास सक्षम असतो. जर एक इच्छा पूर्ण करण्याचा वर मिळाला तर भारतीय संघ निश्चितच कोहलीला सूर गवसावा हाच वर मागेल.
अजिंक्य रहाणेनेही छाप सोडली आहे. तो या स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूंमध्ये स्थान मिळवू शकतो. त्याचप्रमाणे कर्णधार धोनीलाही सूर गवसणे आवश्यक आहे. पण, २०११ च्या विश्वकप स्पर्धेत युवराजच्या समावेशामुळे संघाचा समतोल साधल्या गेला होता, यावेळी मात्र त्याची उणीव भासत आहे. आता रवींद्र जडेजाला ही भूमिका बजवावी लागणार असून स्टुअर्ट बिन्नीकडूनही चांगल्या कामगिरीची आशा आहे. भारतीय संघाने उपांत्य फेरी गाठली तर तो चांगला निकाल असेल आणि जेतेपद कायम राखले तर सोनेपे सुहागा. (टीसीएम)