शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

गुरकीरतची अष्टपैलू खेळी; भारत ‘अ’जिंक्य

By admin | Updated: August 15, 2015 02:00 IST

गुरकीरतसिंग मानच्या (नाबाद ८७ धावा व २ बळी) सुरेख अष्टपैलू खेळीच्या बळावर भारत अ संघाने तिरंगी वनडे मालिकेच्या अंतिम फेरीत आॅस्ट्रेलिया अ संघाला ४ गडी

चेन्नई : गुरकीरतसिंग मानच्या (नाबाद ८७ धावा व २ बळी) सुरेख अष्टपैलू खेळीच्या बळावर भारत अ संघाने तिरंगी वनडे मालिकेच्या अंतिम फेरीत आॅस्ट्रेलिया अ संघाला ४ गडी राखून धूळ चारली.भारताला विजयासाठी २२७ धावांचे लक्ष्य मिळाले होते; परंतु आघाडीची फळी पूर्णपणे कोलमडली. त्यानंतर गुरकीरतच्या नाबाद ८७ धावांच्या बळावर भारताने विजय मिळवला.या मालिकेआधी भारतीय संघाला आॅस्ट्रेलिया अ विरुद्ध विजय मिळवता आला नव्हता; परंतु गेल्या सर्व पराभवाचा हिशेब भारतीय अ संघाने आज चुकता केला.विजयाचा पाठलाग करताना भारताचे आघाडीचे ४ फलंदाज धावफलकावर ६५ धावा असतानाच तंबूत परतले. फॉर्ममध्ये असणाऱ्या मयंक अग्रवालने २९ चेंडूंत ३२ धावा केल्या. एकवेळ भारताची स्थिती ५ बाद १०८ अशी होती; परंतु तळाच्या फळीने संकटमोचकाची भूमिका पार पाडली. आपल्या फिरकी गोलंदाजीच्या बळावर ४१ धावांत २ गडी बाद करणाऱ्या गुरकीरतने फलंदाजीत कमाल केली. त्याने ८५ चेंडूंचा सामना करताना ७ चौकार व २ षटकार मारले. संजू सॅमसनने ४२ चेंडूंत २४ धावा केल्या. केदार जाधवने ३६ चेंडूंत ५ चौकारांसह २९ धावांची उपयुक्त खेळी केली. आॅस्ट्रेलिया अ संघाकडून एस्टोन एगरने २ गडी बाद केले. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक : ५० षटकांत ९ बाद २२६. (उस्मान ख्वाजा ७६, बर्न्स ४१, फर्ग्युसन २१. करण शर्मा ३/३७, गुरकीरतसिंह २/४२, अक्षर पटेल २/२५, धवल कुलकर्णी १/३२, के. नायर १/३३).भारत अ संघ : ४३.३ षटकांत ९ बाद २२९. (गुरकीरतसिंग मान नाबाद ८७, मयंक अग्रवाल ३२, केदार जाधव २९, संजू सॅमसन नाबाद २४, उन्मुक्त चंद २४, एस्टोन एगर २/३९).